शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Car Insurance: कार इन्शुरन्स एजंटला या ३ गोष्टी अवश्य सांगा, कधी होणार नाही नुकसान, राहाल टेन्शन फ्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 2:04 PM

1 / 5
जर इन्शुरन्स नसेल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्याबरोबरच कार अपघात किंवा चोरी होण्याच्या परिस्थितीत इन्शुरन्सच तुमचं आर्थिक नुकसान होण्यापासून वाचवू शकतो. मात्र कार इन्शुरन्स घेताना किंवा रिन्यू करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
2 / 5
आता इन्शुरन्स घेणे खूपच सोपे झाले आहे. अगदी घरबसल्याही तुम्ही इन्शुरन्सचं काम आटोपून घेऊ शकता. तुम्ही इन्शुरन्स ऑनलाईन घ्या किंवा ऑफलाईन घ्या, मात्र कार इन्शुरन्समध्ये तीन गोष्टी अवश्य अॅड ऑन केल्या पाहिजेत. त्या इन्शुरन्समध्ये जोडण्याचा खर्च फार कमी आहे. मात्र तुम्हाला त्यातून भरपूर फायदा मिळू शकतो.
3 / 5
Zero Depreciation: इन्शुरन्स घेताना झीरो डेप सुविधा सर्वप्रथम अॅड केली पाहिजे. ती घेतल्याने जर वाहनामध्या काही मोड तोड झाली, तर तुम्हाला खर्च द्यावा लागत नाही. कारमध्ये होणाऱ्या नुकसानीचा खर्च विमा कंपन्या भरून देतात. विमा कंपनीच गाडीमध्ये नवा पार्ट लावते, किंवा जुना पार्ट दुरुस्त करून देते. त्यामुळे तुमचे खूप पैसे वाचू शकतात.
4 / 5
Engine Protect: अनेकदा कारचं इंजिन खराब होतं. अशा परिस्थितीत नुकसान होण्यापासून वाचण्यासाठी इंजिन प्रोटेक्शनसुद्धा इन्शूरन्समध्ये ठेवा. कारच्या इंजिनात पाणी शिरले. लुब्रिकेटिंग ऑईलचे लिकेज, डिफरेंशियल पार्ट्स किंवा इंजिन फेल झाल्यामुळे झालेल्या नुकसानासाठी कव्हरेज देते.
5 / 5
Invoice Protect: या सुविधा देण्याचा अर्थ असा होतो की, कार चोरीस गेली किंवा पूर्णपणे नुकसानग्रस्त झाली, तर त्या परिस्थितीत तुम्हाला कारची ती किंमत मिळते जी कार खरेदी करताना तुम्ही मोजलेली असते. इनव्हाईस प्रोटेक्टला आरटीआयसुद्धा म्हटले जाते.
टॅग्स :carकारMONEYपैसा