Benelli's Two Adventure Bike Launches In India; The price is strong ...
Benelli च्या दोन अॅडव्हेंचर बाईक भारतात लाँच; किंमतही दमदार... By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 4:48 PM1 / 11Benelli या आंतरराष्ट्रीय कंपनीने पहिल्यांदाच अॅडव्हेंचर टूरर बाईक भारतात लाँच केल्या आहेत. TRK 502 आणि 502X असे या बाईकचे नाव आहे. 2 / 11कंपनी आपल्या बाईक CKD च्या माध्यमातून भारतात विकणार आहे. Benelli TRK 502 या बाईकची किंमत भारतात 5 लाख रुपये एक्स शोरुम ठेवण्यात आली आहे. तर ऑफरोड 502X व्हेरिअंटची किंमत 5.4 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. 3 / 11Benelli ने भारतीय दुचाकी बाजारात विस्तारण्यासाठी हैदराबादच्या महावीर ग्रूपसोबत सहकार्य करार केला आहे. 4 / 11Benelli ने गेल्या वर्षीच TNT 300, 302R आणि TNT 600i लाँच केली होती. 5 / 11Benelli च्या या नव्या बाईकची स्पर्धा Kawasaki Versys 650, Suzuki V-Strom 650XT आणि SWM SuperDual T शी स्पर्धा करणार आहेत.6 / 11Benelli TRK 502 आणि 502X मध्ये 499.6 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. यामध्ये फ्युअल इंजेक्टेड, पॅरलल ट्वीन मोटर देण्यात आली आहे. 7 / 11Benelli चे इंजिन 8500 आरपीएमवर 47.6 पीएसची ताकद निर्माण करते. 4500 आरपीएमवर 45 Nmचा पीक टॉर्क निर्माण करते. 8 / 11Benelli चे हे इंजिन 6-स्पीड ट्रांसमिशनचे आहे. 9 / 11TRK 502मध्ये 17 इंचाचे अॅल्युमिनिअम अलॉय व्हिल्स आणि 502X मध्ये पुढे 19 आणि मागे 17 इंचाचे स्पोक व्हील्स देण्यात आले आहेत. 10 / 11दोन्ही बाईक्सचे वजन 235 किलो आहे. 11 / 11या बाईक 25.6 किमीचे मायलेज देतील असा कंपनीने दावा केला आहे. 29 लीटरची टाकी देण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications