शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Best Car For Small Family : छोट्या फॅमिलीसाठी बेस्ट आहेत 'या' ४ कार्स, किंमत केवळ ३.३९ लाख; मायलेज ३५ किमीपेक्षाही अधिक

By जयदीप दाभोळकर | Published: July 15, 2022 1:42 PM

1 / 10
भारतात दरवर्षी स्वस्त वाहनांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. अजूनही या वाहनांना ग्राहकांकडून प्रचंड मागणी आहे. सध्या भारतात लहान कुटुंबांसाठी अनेक स्वस्त वाहने उपलब्ध आहेत. देखभालीच्या दृष्टीनेही ते खूप किफायतशीर आहे.
2 / 10
अशा परिस्थितीत कमी देखभालीमुळे तुमच्या खिशावर या वाहनांचा भार कमी असतो. आम्ही तुमच्यासाठी कमी किमतीच्या आणि लहान कुटुंबांसाठी सर्वोत्तम वाहनांची यादी घेऊन आलो आहोत. या वाहनांची सुरुवातीची किंमत ₹ 3.39 लाख पासून सुरू होते.
3 / 10
Maruti Suzuki Alto - या जबरदस्त बजेट कारला BS6 नॉर्म्ससह सुसज्ज 0.8 लीटर 3 सिलिंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. सीएनजी मोडवर चालवल्यास हे इंजिन 41 पीएस पॉवर आणि 60 एनएमचा टॉर्क जनरेट करतो. मारुती अल्टो 800 च्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर, यात 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे जी Android Auto आणि Apple CarPlay शी कनेक्ट केली जाऊ शकते.
4 / 10
यात कीलेस एंट्री आणि फ्रंट पॉवर विंडो देखील मिळतात. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ड्रायव्हर साइड एअरबॅग, रियर पार्किंग सेन्सर्स, एबीएस विथ ईबीडी यांसारखे फीचर्सही देण्यात आलेत. या कारची एक्स शोरूम किंमत 3.39 ते 5.03 लाख एक्स शोरूम दिल्ली आहे. पेट्रोलवर 22.05 kmpl तर सीएनजी वर 31.59 kmpg मायलेज देते.
5 / 10
Maruti Suzuki Celerio - नवीन Celerio मध्ये K10C DualJet 1.0-लीटर थ्री-सिलिंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे स्टार्ट/स्टॉप सिस्टमसह येते. हे इंजिन 66 एचपी पॉवर आणि 89 एनएम टॉर्क जनरेट करते. हे सध्याच्या मॉडेलपेक्षा 2 hp पॉवर आणि 1 Nm टॉर्क कमी जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
6 / 10
कारच्या LXI व्हेरिअंटमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध नाही. या कारमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, हिल होल्ड असिस्ट (फर्स्ट-इन सेगमेंट) अशी एकूण 12 सेफ्टी फीचर्स मिळतील. कंपनीचा दावा आहे की नवीन Celerio फ्रंटल-ऑफसेट, साइड क्रॅश आणि पादचारी सुरक्षा यासारख्या सर्व भारतीय सुरक्षा नियमांचे पालन करते. सॉलिड फायर रेड आणि स्पीडी ब्लू यासह आर्क्टिक व्हाइट, सिल्की सिल्व्हर, ग्लिस्टेनिंग ग्रे, कॅफिन ब्राऊन, रेड आणि ब्लू यासह 6 रंगांमध्ये ही कार उपलब्ध असेल. या कारची किंमत 5.25 लाख ते 7 लाख एक्स शोरूम दिल्ली आहे. पेट्रोल मध्ये ही 26.68 kmpl आणि CNG में 35.60 kmpg मायलेज देते.
7 / 10
Maruti Suzuki S-Presso - या कारमध्ये 998cc इंजिन देण्यात आले असून ते 58.33 bhp पॉवर आणि 78 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने या इंजिनचे मॅन्युअल ट्रान्समिशन दिले आहे. हे CNG मॉडेलमध्ये देखील येते. या कारमध्ये मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, फ्रंट सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, पॉवर स्टीयरिंग, एअर कंडिशनर यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.
8 / 10
या कारची एक्स शोरूम किंमत 3.99 लाख ते 5.64 लाख एक्स शोरूम आहे. ही कार पेट्रोलमध्ये 21.7 kmpl, तर CNG व्हेरिअंट 31.2 kmpg चं मायलेज देते.
9 / 10
Tata Tiago - Tata Tiago ला ग्लोबल Ncap क्रॅश चाचणीत 4 स्टार रेटिंग मिळाले आहे. Tata Tiago एकूण 10 व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. त्यात XE, XT(O), XT, XTA, XZ, XZA, XZ+, XZ+ DT, XZA+ आणि XZA+ DT यांचा समावेश आहे. टाटा टियागोमध्ये आवश्यक सर्व फीचर्स उपलब्ध आहेत. यात 15-इंचाचे अलॉय व्हील, वायपरसह मागील डिफॉगर, अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्टसह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, हरमनची 8-स्पीकर साउंड सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि कुल्ड ग्लोव्हबॉक्स यांसारखे फीचर्स देण्यात आली आहेत.
10 / 10
कारच्या AMT व्हेरियंटमध्ये क्रिप फंक्शन आणि 'स्पोर्ट' मोडसह काही अतिरिक्त फीचर्सही मिळतात. याच्या पेट्रोल व्हर्जनमध्ये 1.2 लिटरचं रेवोट्रॉन इंजिन देण्यात आलेय. हे इंजिन 84 बीएचपीची पॉवर आणि 115 एनएमचा टॉर्क जनरेट करते. तर डिझेल व्हेरिअंटमध्ये 1.05 लिटरचं 3 सिलिंडर रेवोटॉर्क इंजिन देण्यात आलेय. ते 69 बीएचपीची पॉवर आणि 140 एनएमचा टॉर्क जनरेट करते. याची किंमत 5.39 लाख एक्स शोरूम दिल्लीपासून सुरू होते. कारचे पेट्रोल व्हेरिअंट 23.84 kmpl, डिझेल 27.28kmpl चे मायलेज देते.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीTataटाटा