शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

केवळ 840 रुपयांत Delhi ते Ladakh पोहोचवेल ही स्वस्त बाईक, जबरदस्त मायलेज; किमत केवळ इतकीच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 5:11 PM

1 / 10
आज आम्ही तुम्हाला अशा मोटरसायकलची माहिती देणार आहोत जी तुम्हाला फक्त 840 रुपयांमध्ये दिल्ली ते लडाख घेऊन जाईल. या मोटरसायकलचे मायलेज इतके जबरदस्त आहे की दिल्ली ते लडाख इतके लांबचे अंतर केवळ 840 रुपयांमध्ये तुम्ही कापू शकता.
2 / 10
अलीकडे भारतात पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. अनेक रिपोर्ट्सनुसार, किंमत आणखी वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत, लोक 115cc इंजिनपर्यंत मोटरसायकल घेणे पसंत करत आहेत, ज्यांचे मायलेज खूप चांगले आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला मायलेजच्या बाबतीत या मस्त मोटरसायकलची माहिती देणार आहोत.
3 / 10
बजाज ऑटोची ही बाईक बजाजच्या स्वस्त मोटारसायकलींपैकी एक आहे आणि शक्तिशाली देखील आहे. यात 115 सीसी इंजिन आहे.
4 / 10
हे 7000 rpm वर 6.3 kV चा पॉवर आणि 5000 rpm वर 9.81 Nm टॉर्क जनरेट करते. यात 5 स्पीड ट्रान्समिशन देण्यात आले आहे. या बाईकची किंमत रु. 69,216 (एक्स-शोरूम दिल्ली) पासून सुरू होते.
5 / 10
ही मोटरसायकल 84 kmpl पर्यंत मायलेज देते. आणि हे मायलेज ARAI द्वारे प्रमाणित आहे. दिल्ली ते लेह (शांती स्तूप) पर्यंतचं अंतर 968.3 किमी आहे.
6 / 10
ही मोटरसायकल 84 kmpl पर्यंत मायलेज देते. आणि हे मायलेज ARAI द्वारे प्रमाणित आहे. दिल्ली ते लेह (शांती स्तूप) पर्यंतचं अंतर 968.3 किमी आहे.
7 / 10
बजाज प्लॅटिनाची 11 लिटर इंधन टाकी क्षमता, पेट्रोलची किंमत आणि मायलेजच्या आधारे ही बाईक 840 रुपयांच्या पेट्रोलमध्ये इतके लांब अंतर कापू शकते.
8 / 10
या सेगमेंटमधील ही पहिली मोटरसायकल आहे जी ABS फिचरने सुसज्ज आहे. या बाईकमध्ये उत्तम सस्पेंशनही देण्यात आले आहे. खड्डे आणि खराब रस्त्यांवर दुचाकीस्वाराला कमी झटके बसतील. याशिवाय, इंटिग्रेटेड डीआरएलसह एलईडी हेडलॅम्प, एबीएस-इंडिकेटिंग अॅनालॉग स्पीडोमीटर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
9 / 10
आरामदायी प्रवासासाठी यात स्प्रिंग-इन-स्प्रिंग सस्पेंशन आहे. यात ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. प्रवासादरम्यान धक्का लागू नये म्हणून याला पूर्वीपेक्षा 20 टक्के मोठे फ्रंट आणि रियर सस्पेंशन देण्यात आले आहे.
10 / 10
याशिवाय एलईडी डीआरएल हेडलॅम्प आणि रुंद रबर फूटपॅड्स चांगल्या ग्रिपसाठी देण्यात आले आहेत. ही बाईक भारतीय बाजारात तीन रंगात उपलब्ध आहे. यामध्ये चारकोल ब्लॅक, व्होल्कॅनिक रेड आणि बीच ब्लू यांचा समावेश आहे.
टॅग्स :Automobileवाहनbajaj automobileबजाज ऑटोमोबाइल