Best Tyre For Car: How to choose the right tyre for your car? How many types of tyres? Find out...
Best Tyre For Car: तुमच्या कारसाठी योग्य टायर कसा निवडाल? टायरचे प्रकार किती? जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 11:48 AM1 / 7कोणत्याही कारसाठी सर्वात गरजेचे असतात ते टायर. कारण तेच एक असतात जे जमिन आणि कारला जोडून ठेवतात. ते मायलेजही देतात, ते अपघातापासूनही वाचवितात पण हेच टायर जर वाईटावर उतरले तर इंधन जाळतात आणि जिवही घेतात. यामुळे तुमचा तुमच्या एरियानुसार कारचे टायर कोणते चांगले ते पाहूनच ते निवडायचे असतात. 2 / 7तसे परदेशात प्रत्येक सिझनचे टायर असतात. लोक ते बदलतातही. परंतू आपल्याकडे तेवढे खर्च करणारे नसल्याने ऑल सिझन टायर विकले जातात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे जरी ऋतू असले तरी आपल्याकडे कधी पाऊस पडेल आणि कधी उन सांगता येत नाही. शिवाय तुम्हाला रस्त्यांची क्वालिटी माहिती आहेच. एक्स्प्रेस हायवेवर देखील तुम्ही टुनटुन उडत जात असता एवढे आपल्याकडचे रस्ते गुळगुळीत आहेत. खड्डे असे की मातीचा रस्ता चांगला वाटेल. असो, पण तुम्हाला या साऱ्या परिस्थितीतून टायरच सावरून नेतात. 3 / 7काहीजण तुम्ही कोणत्या कंपनीचे टायर वापरतात यावरून जज करतात. समजा मिशेलिन, ब्रिजस्टोन असेल तर श्रीमंत म्हणजे महाग टायर घेणारा, अपोलो, जेके आणि सिएट अशा कंपनीचे टायर घेतले तर मिडलक्लास असा समज असतो. हा समज जे करतात ते लोक काहीशी इर्षा करणारे असतात. यामुळे तुम्ही टायर घेताना पैशाचा नाही तर तुमचे वाहन कोणत्या रस्त्यांवरून जाते, सिमेंटच्या की डांबरी, एरिया म्हणजे एमआयडीसी किंवा वर्षानुवर्षे रस्त्यांची कामे सुरु असलेला रस्ता असेल किंवा पावसाळा जास्त असेल किंवा उन्हाळा जास्त असेल तर त्यानुसार टायरची निवड करावी. 4 / 7एलटी आणि मड टायर्स हे भारतातील एसयूव्हींना वापरले जातात. एलटी टायर्सना हलके ट्रक टायर म्हणतात. तर मड म्हणजेच चिखलात चालू शकणारे खास तशा डिझाईनचे बनविलेले असतात. ते विविध आकारात देखील येतात, परंतु त्यापैकी बहुतेक स्कॉर्पिओ, थार, इसुझू डिमॅक्स सारख्या एसयूव्हीमध्ये दिसतात. हे टायर तसे सर्वच कंपन्या चालवितात. 5 / 7या टायर्सचे वैशिष्टय़ म्हणजे ते लावल्याने प्रचंड वेगातही कार नियंत्रणात राहते. हे टायर्स बहुतेक स्पोर्ट कारमध्ये आढळतात. सामान्य कारच्या वापरासाठी ते उपयुक्त नसतात. ते मऊ रबराचे असतात. ओल्या आणि कोरड्या हवामानात ते चांगल्या प्रकारे ग्रिप धरतात. परफॉर्मन्स टायर म्हणून या टायरची ओळख आहे. 6 / 7नावासारखेच या टायरचे कामही असते. जास्त वापरल्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये हे टायर वापरले जातात. हे टायर अधिकतर एमपीव्ही सारख्या गाड्यांमध्ये वापरले जातात. हे टायर एका विशेष अशा पॅटर्नचे असतात. ते सामान्य टायरपेक्षा थोडे महाग असतात. तसेच वाहन धावत असताना आवाजही कमी करतात. 7 / 7या सर्व टायरमध्ये तुम्हाला ग्रिप आणि थ्रेडचा पॅटर्न खूप महत्वाचा असतो. कारण पावसाळ्यात रस्ते निसरडे असतात. त्यात या टायरने ग्रिप पकडणे खूप महत्वाचे असते. यासाठी त्या टायरखालून पाणी झटकन बाहेर फेकले जाणे हे देखील खूप महत्वाचे असते. उन्हाळ्यात टायर तापून फुटण्याची शक्यता असते. यामुळे पावसाळा आणि उन्हाळा किती असतो ते पाहून तुम्ही त्यानुसार टायर निवडावेत. जर तुमच्याकडे पाऊस खूप असेल जसे की कोकण पट्ट्यात तर तुम्ही पाणी झटकन निघून जाणारे टायर निवडावेत. उन्हाळा जास्त असेल तर तुम्ही तेवढे तापमान सहन करू शकणारे टायर निवडावेत. आणखी वाचा Subscribe to Notifications