शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतात येण्यापूर्वीच इलॉन मस्क यांना झटका; Tesla च्या प्रतिस्पर्धी कंपनीने केली मोठी घोषणा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2024 4:48 PM

1 / 5
Elon Musk India Tesla: केंद्र सरकार इलॉन मस्क यांच्या Tesla कंपनीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान, अलीकडेच बातमी आली होती की, मस्क गुजरातमध्ये टेस्लाचा पहिला कारखाना उभारणार असून, लवकरच याची अधिकृत घोषणा होईल. पण, या घोषणेपूर्वीच Tesla ला झटका लागला आहे. टेस्लाच्या प्रतिस्पर्धी कंपनीने तामिळनाडूमध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता ही कंपनी इलॉन मस्क यांचे गणित बिघडू शकते.
2 / 5
16 हजार कोटींची गुंतवणूक- VinFast असे या कंपनीचे नाव असून, ही जगातील टॉप ईव्ही कंपन्यांपैकी एक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हिएतनाममधील आघाडीची EV निर्माता कंपनी Vinfast तामिळनाडूमध्ये दोन अब्ज डॉलर्स म्हणजेच, 16 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तीची गुंतवणूक करणार आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की Vinfast आणि तामिळनाडू सरकारमध्ये करार झाला असून, पहिल्या टप्प्यात $500 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक होईल आणि उर्वरित गुंतवणूक येत्या पाच वर्षांत केली जाईल.
3 / 5
3500 नोकऱ्या निर्माण होतील-तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले की, विनफास्ट राज्यातील तुतिकोरिनमध्ये ईव्ही कार आणि बॅटरी उत्पादन युनिट स्थापन करेल आणि यासाठी 16,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. दक्षिण तामिळनाडूच्या आर्थिक विकासासाठी ही मोठी झेप आहे. दरम्यान, या गुंतवणूकीनंतर राज्यात 3,500 नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
4 / 5
इलॉन मस्क यांना कडवी स्पर्धा- इलॉन मस्क यांच्या घोषणेपूर्वीच विनफास्टने ही घोषणा केली आहे. याचा अर्थ Vinfast मेक इन इंडिया कार भारतात आणणार आहे. यामुळे इलॉन मस्क यांना भारतात कडबी स्पर्धा असणार आहे. टेस्लाच्या इंपोर्टेड कारची किंमत 20-25 लाख रुपये असेल. तर, विनफास्टची मेक इंडिया कार टेस्लापेक्षा स्वस्त असण्याची शक्यता आहे. इलॉन मस्क मेक इंडिया टेस्ला कार बनवायला सुरुवात करतील, तेव्हाच ते भारतीय बाजारपेठेत टिकून राहू शकतील.
5 / 5
ह्युंदाईही दाखल झाली-ह्युंदाईनेही तामिळनाडूमध्ये सुमारे 62 अब्ज रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत ईव्ही आणि बॅटरीसाठी एक उत्पादन युनिट स्थापन केले जाईल. या युनिटमधून सुमारे 500 ते 1000 नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ टेस्लासमोर विनफास्टसह ह्युंदाईचेही आव्हान असणार आहे.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरElectric Carइलेक्ट्रिक कारelon muskएलन रीव्ह मस्कAutomobile Industryवाहन उद्योग