Big savings! Get bumper discounts on Maruti Suzuki's cars, book now
मोठी बचत! मारुती सुझुकीच्या 'या' गाड्यांवर मिळतीये बंपर सूट, आताच करा बूक... By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 2:53 PM1 / 14 वर्षाच्या शेवटच्या महिन्यात सर्व कार कंपन्यांना अधिकाधिक वाहने विकायची आहेत. यासाठी ते आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या डिस्काउंट ऑफर्स देत आहेत. भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी देखील आपल्या ग्राहकांना अनेक उत्तम ऑफर देत आहे. कंपनीने या ऑफर्सची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण, डीलर्सकडून या सवलतींची माहिती मिळाली आहे. जाणून घ्या कंपनी त्यांच्या कोणत्या वाहनांवर किती सूट देत आहे.2 / 14 Maruti Suzuki Alto 800- या ऑफरपैकी सर्वात परवडणारी ऑफर Alto 800 कारवर आहे. या कारवर 30,000 रुपयांपर्यंत रोख सवलत, 15,000 रुपयांचे एक्सचेंज बोनस आणि 2,500 रुपयांचा कॉर्पोरेट लाभ मिळत आहे.3 / 14 Maruti Suzuki S-Presso- ही छोटी एसयूव्ही तिच्या फंकी लूक आणि उच्च ग्राउंड क्लीयरन्समुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरते. या महिन्यात, S-Presso 33,000 रुपयांपर्यंतच्या सवलतीसह खरेदी केले जाऊ शकते, ज्यामध्ये 15,000 रुपयांचा रोख लाभ आणि 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे. याशिवाय 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूटही मिळणार आहे.4 / 14 Maruti Suzuki Eeco- मारुती सुझुकी इको ही एकमेव व्हॅन आहे, जी मारुतीकडे सध्या तिच्या लाइनअपमध्ये आहे. यावर 28,000 रुपयांचा लाभ मिळत आहे. यात 15,000 रुपयांचा रोख लाभ, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे.5 / 14 Maruti Suzuki WagonR- मारुती सुझुकी वॅगन आर हे भारतातील कंपनीचे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे. तरीही, कंपनी या महिन्यात WagonR च्या खरेदीवर 33,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. सवलतींमध्ये 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 20,000 रुपयांचा रोख लाभ आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे.6 / 14 Maruti Suzuki Celerio- सेलेरियो नुकतीच नव्याने लॉन्च करण्यात आली आहे. तरीदेखील या गाडीवर 5,000 रुपयांच्या रोख लाभासह 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे.7 / 14 Maruti Suzuki Swift- मारुती सुझुकी स्विफ्ट भारतात अतिशय पसंतीची गाडी आहे. सध्या, स्विफ्टवर 20,000 रोख लाभ, 3,000ची कॉर्पोरेट सवलत आणि 10,000 च्या एक्सचेंज बोनससह खरेदी केली जाऊ शकते.8 / 14 Maruti Suzuki Dzire-स्विफ्ट डीझायरवर आधारित सेडान देखील उत्तम ऑफर्ससह उपलब्ध आहे. या महिन्यात डिझायर खरेदीवर रु. 10,000 चा रोख लाभ, रु. 10,000 चे एक्सचेंज बोनस आणि रु. 3,000 कॉर्पोरेट सूट आहे.9 / 14 Maruti Suzuki Vitara Brezza- मारुती सुझुकी विटारा ब्रेझा ही भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विकली जाणारी कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. तरीही, यावर कंपनी 10,000 रुपयांच्या रोख लाभासह 15,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट लाभ मिळत आहे.10 / 14 Maruti Suzuki Ignis- मारुती सुझुकी आउटलेट्सच्या Nexa चेनमधील सर्वात लहान आणि सर्वात स्वस्त ऑफर म्हणजे इग्निस. ही 5,000 रुपयांच्या रोख लाभासह आणि 10,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनससह खरेदी केले जाऊ शकते. याशिवाय यावर 2,500 रुपयांची कॉर्पोरेट सूटही मिळत आहे.11 / 14 Maruti Suzuki Baleno- या प्रीमियम हॅचबॅकवर 33,000 रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. डीलमध्ये 20,000 रुपयांपर्यंतचा रोख लाभ, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे.12 / 14 Maruti Suzuki Ciaz- मारुती सुझुकीची सी-सेगमेंट सेडान सियाझ, रु. 25,000 च्या एक्सचेंज बोनससह आणि रु. 10,000 च्या रोख लाभासह उपलब्ध आहे. याशिवाय, सियाझच्या खरेदीवर 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील लागू आहे.13 / 14 Maruti Suzuki S-Cross- या महिन्यात एस-क्रॉसवर रु. 50,000 च्या सवलतीचा लाभ घेता येईल, ज्यामध्ये रु. 20,000 चा रोख लाभ, रु. 25,000 चा एक्सचेंज बोनस आणि रु. 5,000 कॉर्पोरेट सूट आहे.14 / 14 या गाड्यांवर सवलत नाही- कंपनी XL6 आणि Ertiga सारख्या मॉडेल्सवर सूट देत नाहीये. तसेच, Alto, S-Presso, WagonR, Eeco आणि Ertiga च्या CNG ट्रिम्सच्या खरेदीवर कोणतीही सूट लागू नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications