शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हटके लूक; लवकरच लॉन्च होणार BMW ची इलेक्ट्रिक स्कूटर; TVS मोटर्स करणार प्रोडक्शन...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 7:44 PM

1 / 7
इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता कंपन्या नवनवीन गाड्या मार्केटमध्ये आणत आहे. अलीकडेच BMW ने त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर BMW CE 02 लॉन्च करण्याची तयारी केली आहे. काही दिवसांपूर्वीच ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतात स्पॉट झाली आहे.
2 / 7
ही स्कूटर गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात लॉन्च करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या स्कूटरच्या भारतातील लॉन्चिंगमध्ये TVS ची मोठी भूमिका आहे.
3 / 7
ऑटोमोबाईल उद्योगातील या दोन दिग्गज TVS मोटर आणि BMW, या कंपन्यांची व्यावसायिक भागीदारी आहे. या अंतर्गत BMW ची इलेक्ट्रिक स्कूटर TVS च्या प्रोडक्शन प्लांटमध्ये बनवली जाईल. रिपोर्ट्सनुसार, BMW इलेक्ट्रिक स्कूटर कर्नाटकच्या शृंगेरी परिसरात चाचणी दरम्यान दिसली आहे.
4 / 7
या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल बोलायचे झाल्यास, CE 02 फ्युचरिस्टीक डिझाइनसह येते. स्कूटरचा लूक सामान्य स्कूटरपेक्षा खूप खूपच वेगळा आहे. याशिवाय या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कस्टमायझेशनचा पर्यायही उपलब्ध असेल. म्हणजेच, ग्राहक या स्कूटरमध्ये बदल करू शकतो. यासोबत विविध अॅक्सेसरीज देखील मिळतील.
5 / 7
BMW CE 02 ची वैशिष्ट्ये- BMW CE 02 इलेक्ट्रिक स्कूटरला 3.5-इंचाची TFT स्क्रीन मिळेल. ही स्क्रीन ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येते. याशिवाय एलईडी हेडलाईट, USD फ्रंट फोर्क, राइज्ड हँडलबार यांसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. या स्कूटरमध्ये 14-इंच व्हील्स असतील. तसेच, दोन्ही बाजूला डिस्क ब्रेक सपोर्ट असेल.
6 / 7
BMW CE 02 ची बॅटरी आणि रेंज- BMW CE 02 मध्ये सिंगल आणि ड्युअल लिथियम-आयन बॅटरी पॅक पर्याय उपलब्ध असेल. या प्रत्येक बॅटरी पॅकची क्षमता 2kWh आहे. सिंगल बॅटरी पॅक व्हर्जनचे वजन 119 किलो आहे. हे व्हर्जन 45 किमी प्रतितास वेगाने धावू शकेल. पूर्ण चार्ज केल्यावर ही स्कूटर 45 किलोमीटरची रेंज देईल.
7 / 7
डबल बॅटरी पॅक मॉडेलचे वजन 132 किलो आहे. ही स्कूटर 95 kmph चा टॉप स्पीड पकडू शकते. हे व्हर्जन एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 90 किलोमीटरची रेंज देईल.
टॅग्स :Bmwबीएमडब्ल्यूAutomobileवाहनelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर