शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आली BMW ची नवी Electric Scooter; जबरदस्त फीचर्ससह मिळणार १३० किमीची रेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 12:53 PM

1 / 11
जगभरात सध्या इलेक्ट्रीक वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेषकरून अनेकांचा कल हा दुचाकी वाहनांकडे आहे.
2 / 11
ग्राकांचा वाढता कल आणि भविष्याकडे पाहता अनेक कंपन्या आता इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनात उतरू लागल्या आहेत.
3 / 11
जर्मनीची प्रमुख दुचाकी वाहन उत्पादक कंपनी BMW Motorrad नं आपली नवी इलेक्ट्रीक स्कूटर CE04 सादर केली आहे. ही स्कूटर दोन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. यामध्ये स्टँडर्ड आणि अवेंटगार्डे यांचा समावेश आहे.
4 / 11
डिझाईनबद्दल सांगायचं झालं तर ही स्कूटर 04 कॉन्सेप्टवर बेस्ड आहे. या स्कूटरमध्ये स्पोर्टी एप्रन अप फ्रन्ट, लाँग साईड प्रोफाईल आणि स्लीक टेल सेक्शन देण्यात आले आहेत.
5 / 11
या स्कूटरच्या स्टँडर्ड व्हर्जनला कंपनी मॅट ब्लॅकसोबत स्पोर्ट लाईट व्हाईट रंगात सादर करण्यात आलं आहे. तर Avantgarde व्हेरिअंट मॅगेलन ग्रे पेंटमध्ये सादर करण्यात आली आहे. यामध्ये ब्लॅक/ऑरेंज सीट, ऑरेंज टिंटेड व्हायझर आणि काही बॉडी ग्राफीक्सचा समावेश आहे.
6 / 11
या स्कूटरमध्ये 15 इंचाचे व्हिल्स देण्यात आले आहे. तसंच यामध्ये 8.9kWh इंजिन क्षमतेचं लिथियम आयन बॅटरी पॅक देण्यात येणार आहे.
7 / 11
या स्कूटरची इलेक्ट्रीक मोटर 20HP पासून अधिक दमदार पॉवर इंजिन जनरेट करतं. तसंच यामध्येपर्ली लोडेड अॅडजस्टेबल मोनोशॉक सस्पेंशन देण्यात आलंय. या स्कूटरचा परफॉर्मन्सही उत्तम आहे.
8 / 11
केवळ 2.6 सेकंदात ही स्कूटर ० ते ५० किमी प्रति तासाचा वेग पकडू शकते. या स्कूटरचा टॉप स्पीड 120किमी प्रति तास आहे. यामध्ये देण्यात आलेली बॅटरीही लवकरच चार्ज होते.
9 / 11
6.9kW चार्जरनं ही बॅटरी चार्ज होण्यासाठी १ तास ४० मिनिटं आणि 2.3kW च्या चार्जरनं चार्ज होण्यासाठी४ तास ३० मिनिटं लागतात. सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर १३० किलोमीटरची रेंज देते.
10 / 11
या स्कूटरमध्ये अनेक अॅडव्हान्स फीचर्ससोबत तीन ड्रायव्हिंग मोड्स देण्यात आले आहे. यामध्ये इको, रोड आणि रेन यांचा समावेश आहे. अन्य फीचर्स म्हणून यात ऑल एलईडी लायटिंग, एबीएस, १०.२५ इंचाचा डिजिटल क्लस्टर, स्मार्टफोन कनेक्टिव्हीची, युएसबी चार्जिंग देण्यात आलं आहे.
11 / 11
तसंच या स्कूटरमध्ये पर्याय म्हणून डायनॅमिक ट्रॅक्शन कंट्रोल, डायनॅमिक राईड मोड आणि कॉर्निग अँटी लाँक ब्रेकिंग सिस्टम देण्यात आलं आहे.
टॅग्स :Bmwबीएमडब्ल्यूelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनscooterस्कूटर, मोपेड