शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

BMW नं लाँच केली R 18 Classic बाईक, पाहा काय आहेत फीचर्स आणि किती आहे किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 11:07 AM

1 / 20
जर्मनीची लग्झरी कार उत्पादक कपंनी बीएमडब्ल्यूची बाईक उत्पादक कंपनी बीएमडब्ल्यू मोटरराडनं (BMW Motorrad) भारतात आपली नवी क्रुझर बाईक R18 Classic लाँच केली आहे. (सर्व फोटो - BMW Motorrad India)
2 / 20
ऑल-न्यू बीएमडब्ल्यू आर 18 क्लासिकला BMW Motorrad India डीलर्स नेटवर्कतर्फे ऑर्डर करता येणार आहे.
3 / 20
गेल्या वर्षी बीएमडब्ल्यू आर 18 च्या प्रिमिअरंतर बीएमडब्ल्यू मोटरराड इंडियानं आपल्या नव्या क्रुझर सेगमेंटचे दुसरे प्रोडक्टही सादर केले आहेत.
4 / 20
ऑल न्यू बीएमडब्ल्यू ऍर 18 क्लासिक ही एक नॉस्टॅलिक टुअरिंग बाईक आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार ही बाईक देशात टुअरिंग क्रुझर मॉडेलची सुरूवात आहे
5 / 20
या बाईकमध्ये 1802 सीसीचं इंजिन देण्यात आली. जे प्रामुख्यानं एसयुव्ही कार्समध्ये मिळतं.
6 / 20
हे इंजिन 4,750rpm वर 91hp ची पॉवर आणि 3,000 rpm चा टॉर्क जनरेट करतेय यामध्ये 2,000 ते 4,000 rpm मध्येही 150Nm चा टॉर्क उपलब्ध असतो. त्यामुळे ही बाईक रस्त्यांवरून सुसाट वेगानं पळू शकते.
7 / 20
या बाईकमध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त यात रिव्हर्स गिअरही देण्यात आला आहे.
8 / 20
यात सिंगल ड्राय क्लच टॉर्कला ट्रान्समिशन पाठवतो. बाईकच्या सस्पेन्शनबद्दल सांगायचं झाल्यास यात डबल स्टील ट्यूब फ्रेम देण्यात आलं आहे.
9 / 20
ब्रेकिंगसाठी फ्रन्ट व्हिल्समध्ये ट्विन डिस्क आणि मागील बाजूला सिंगल डिस्क देण्यात आले आहेत.
10 / 20
याव्यतिरिक्त बीएमडब्ल्यू आर 18 क्लासिकमध्ये अँटी होपिंग क्लच आणि 4 पिस्टन फिक्स्ड कॅलिपरही देण्यात आले आहेत.
11 / 20
या बाईकमध्ये रेन, रॉल आणि रॉक हे तीन रायडींग मोड मिळतात. सर्वच मोड्समध्ये काही ना काही खास फीचर्स देण्यात आले आहेत.
12 / 20
रेन मोडचा वापर केल्यास पावसात बाईक स्लीप होणार नाही. तर रोल मोडचा वापर केल्यास इंजिन अधिक क्षमतेनं काम करेल आणि बाईक आयडियल परफॉर्मन्स देईल. रॉक मोडमध्ये बाईकरला बाईकमध्ये अधिक पॉवर असल्याचं जाणवेल.
13 / 20
बीएमडब्ल्यू आर 18 क्लासिक ही बाईक आपल्या जबरदस्त लूक आणि अनेक फीचर्सनं लोकांना आकर्षित करते. यामध्ये एक मोठी विंडस्क्रीन, पॅसेंजर सीट, सँडल बॅग, एलईडी अॅडिशनल हेडलाईट्स आणि 16 इंचाचे फ्रन्ट व्हिल्स मिळतात.
14 / 20
सुरक्षेच्या दृष्टीनं ही बाईक उत्तम आहे. यामध्ये एबीएस, ऑटोमॅटिक स्टेबिलिटी कंट्रोल, डायनॅमिक इंजिन ब्रेक कंट्रोल, हिल स्टार्ट सिस्टम, कि-लेस इग्निशन, इलेक्ट्रॉनिक क्रुझ कंट्रोलसारखे सेफ्टी फीचर्स मिळतात.
15 / 20
या बाईकची भारतातील एक्स शोरूम किंमत ही 24 लाख रूपयांपासून सुरू होती. या किंमतीत जीएसटी सामील करण्यात आला आहे.
16 / 20
'बीएमडब्ल्यू मोटरराडनं बीएमडब्ल्यू आर 18 सोबत BMW क्रुझर सेगमेंटमध्ये मोठी सुरूवात केली आहे. भारतात पहिली क्रुझर यशस्वी झाल्यानंतर त्या आधारावर आम्ही बीएमडब्ल्यू आर 18 क्लासिकला एक आयकॉनिक कॅरेक्टर म्हणून सादर करत आहोत,' अशी माहिती भारतातील बीएमडब्ल्यू समुहाचे अध्यक्ष विक्रम पावा यांनी सांगितलं.
17 / 20
ही बाईक पूर्णपणे बिल्ट युनिटच्या रूपात भारतात आणून त्याची विक्री केली जाणार आहे. लवकरच या बाईकची विक्री सुरू करण्यात येईल.
18 / 20
या बाईकसोबत कंपनी तीन वर्ष आणि अनलिमिटेड किलमीटरची वॉरंटी देते.
19 / 20
याव्यतिरिक्त कंपनी बाईकसाठी वर्षाचे 365 दिवस 24 तास रोड साईड असिस्टँट पॅकेजसोबत उपलब्ध आहे.
20 / 20
या बाईकसोबत अॅक्सेससरीज आणि मॉडिफिकेशनसाठी अनेक पर्याय मिलतात. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ही बाईक मॉडिफाय करता येऊ शकते.
टॅग्स :Bmwबीएमडब्ल्यूbikeबाईकIndiaभारत