BMW Vision Amby: BMW Motorrad unveils concept electric bicycle with 300km range
BMW Vision Amby: BMW ची भन्नाट सायकल, एका चार्जवर 300 किमी पळणार; वेग एवढा की लायसन लागणार By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 11:40 AM1 / 7BMW च्या सायकल युनिटने BMW Motorrad च्या नव्या कॉन्सेप्ट इलेक्ट्रीक सायकलवरून पडदा हटविला आहे. ही नाही सायकल आहे ना ही बायसिकल, या दोघांचा सुवर्णमध्य साधलेला कॉन्सेप्ट आहे. कंपनीचा दावा आहे की, ही सायकल सिंगल चार्जमध्ये 300 किमीची रेंज देते. (2021 IAA: BMW Motorrad unveils Vision Amby concept electric bicycle with 300km range)2 / 7BMW Motorrad ने आपल्या व्हिजन अँम्बी (Vision Amby) इलेक्ट्रीक सायकलला 2021 International Motor Show (IAA) शोमध्ये दाखविले आहे. ही कंपनीच्या पाच नवीन कॉन्सेप्ट व्हेईकलपैकी एक आहे. अन्य व्हेईकल कंपनी IAA Mobility 2021 मध्ये दाखविणार आहे. 3 / 7BMW Vision Amby ही सायकल झोनमध्ये 25 किमी प्रति तासाच्या वेगाने चालविता येईल. तर शहरातील अंतर्गत रस्त्यांवर ही सायकल 45 किमीच्या वेगाने चालविता येईल. मुख्य रस्त्यांवर ही सायकल 60 किमीच्या वेगाने चालविता येईल4 / 7BMW Vision Amby मध्ये फक्त वेगाचीच चर्चा नाहीय तर ती जी रेंज देते ती अफलातून आहे. कारण ही रेंज अद्याप कोणतीही ईलेक्ट्रीक स्कूटरही देत नाहीय. ही इलेक्ट्रीक सायकल हाय स्पीड आहे, त्यामुळे तिचे रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. 5 / 7BMW Vision Amby एक हाय स्पीड इलेक्ट्रीक सायकल आहे. यामुळे रजिस्ट्रेशनच नाही तर तिला हेल्मेट घालून चालवावे लागणार आहे.6 / 7यासाठी ड्रायव्हिंग लायसनची देखील गरज लागणार आहे. जर लोक ही सायकल वेगाने चालवत असतील तर लायसन लागणार आहे. तसेच पॅडलऐवजी फुटरेस्ट असणार आहे. 7 / 7BMW Vision Amby मध्ये पुढील चाक26 इंचाचे असेल, तर मागील चाक 26 इंचाचे असेल. पुढील टायर बारीक असेल तर मागील चाकाला फुगीर टायर दिला जाईल. याचे वजन 65 किलो असून उंची 830mm आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications