Booking of Skoda new SUV Kylaq has started car priced less than 8 lakhs
Skoda Kylaq चे बुकिंग सुरु; ८ लाखांपेक्षा कमी किमतीच्या कारचे जाणून घ्या सर्व तपशील By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 5:51 PM1 / 9स्कोडाची SUV Skoda Kylaq ही कार भारतीय ग्राहकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. या विक्री सुरु करुन कंपनीने सब फोर मीटर स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. 2 / 9कंपनीने या एसयूव्हीची सुरुवातीची किंमत ७.८९ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. त्यामुळे आता या कॉम्पॅक्ट एसयूव्ही कायलॅकची स्पर्धा Hyundai Venue, Maruti Suzuki Brezza, Kia Sonet, Tata Nexon आणि Mahindra XUV 3XO सारख्या गाड्यांशी असणार आहे.3 / 9स्कोडा कायलॅकचे बुकिंग आज दुपारी ४ वाजल्यापासून सुरु झालं आहे. कारची डिलिव्हरी २७ जानेवारी २०२५ पासून सुरू होणार आहे. जानेवारी २०२५ मध्ये होणाऱ्या भारत मोबिलिटी २०२५ मध्येही ही कार प्रदर्शित केली जाणार आहे.4 / 9८ लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या या नवीन एसयूव्हीमध्ये उत्कृष्ट वैशिष्ट्ये आहेत. तसेच केवळ ११ हजार रुपयांमध्ये ही कार बुक करता येणार आहे.5 / 9स्कोडा कायलॅक ही चार प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. यामध्ये क्लासिक, सिग्नेचर, सिग्नेचर प्लस आणि प्रेस्टीज या मॉडेलचा समावेश आहे. तसेच या कारमध्ये तुम्हाला बरेच रंगाचे पर्याय देखील मिळतील. यामध्ये लावा ब्लू, टोर्नाडो रेड, कार्बन स्टील, ब्रिलियंट सिल्व्हर आणि कँडी व्हाइट सारखे रंग आहेत.6 / 9स्कोडा कायलॅकचे डिझाईन हे आकर्षक करण्यात आलंय. स्टायलिश असण्यासोबतच या कारचा आकारही कॉम्पॅक्ट आहे. त्यामुळे शहरात ही कार चालवणे तुम्हाला सोपे जाईल. कारमध्ये १७ इंची अलॉय व्हील आहेत.7 / 9स्कोडा कायलॅकचे इंटिरियर डिझाईन देखील आकर्षक करण्यात आलं आहे. कारमध्ये तुम्हाला ड्युअल डिजिटल स्क्रीन, पॉवर्ड ड्रायव्हर सीट, लेदरेट अपहोल्स्ट्री, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, ॲम्बियंट लाइटिंग आणि कँटनची ६-स्पीकर साउंड सिस्टम मिळेल.8 / 9स्कोडा कायलॅकमध्ये तुम्हाला सुरक्षेच्या दृष्टीने ६ एअरबॅग देण्यात आल्या आहेत. कारमध्ये, तुम्हाला EBD सह ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, Isofix चाइल्ड सीट माउंटिंग पॉइंट्स, हेडरेस्ट आणि ३-पॉइंट सीट बेल्ट देण्यात आले आहेत. 9 / 9नवीन स्कोडा कायलॅकमध्ये १ लिटर TSi पेट्रोल इंजिन आहे, जे ११४bhp पॉवर आणि १७८Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ६-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असणारं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications