शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Hyundai ला जबर दणका, लोकांकडून बुकिंग रद्द करण्याचं आवाहन; वादावर FADA नं मागितलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 2:59 PM

1 / 11
ह्युंदाईच्या (Hyundai) पाकिस्तानी (Pakistan) भागीदार निशांत ग्रुपने काश्मीरवर (Kashmir) ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम वादग्रस्त पोस्ट केली होती. हे प्रकरण आता अधिकच तापले आहे. याबाबत भारतातील ह्युंदाईने माफी मागावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र कंपनीने अद्याप तसे केलेले नाही.
2 / 11
त्यामुळे आता लोकांनी ह्युंदाईच्या गाड्यांवर बहिष्कार घालण्यास सुरूवात केली असून कंपनीला याचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, लोक कंपनीला फोन करून त्यांच्या गाड्या विकत घेणार नसल्याचंही सांगत असल्याची माहिती समोर आलं आहे.
3 / 11
भारतातील सोशल मीडियावर (Social Media) शेकडो लोक बहिष्काराच्या आवाहनाला पाठिंबा देत हुंडईने माफी मागण्याची मागणी करत आहेत. याशिवाय, पाकिस्तानस्थित किया मोटर्स (Kia Motors) क्रॉसरोड्सनेही असेच एक वादग्रस्त ट्विट केले होते, ज्याबद्दल भारतात किआने माफी मागण्याचे प्रकरणही तापत असल्याचे दिसत आहे.
4 / 11
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) ने Hyundai Pakistan आणि Kia Pakistan सोशल मीडिया पोस्टसह काश्मीर मुद्द्यावरील वादावर अधिकृत विधान जारी केले आहे.
5 / 11
“आम्ही ह्युंदाई पाकिस्तान आणि किया पाकिस्तानचा काश्मीरवरील ट्विटसाठी तीव्र निषेध करतो. आम्ही आमच्या मातृभूमीसाठी वचनबद्ध आहोत आणि याबाबत आमची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आम्ही भारतातील दोन्ही कंपन्यांना पत्र लिहिले आहे.
6 / 11
आम्ही अवजड उद्योग मंत्रालय आणि सियाम इंडियाला Hyundai कडून स्पष्टीकरण मागण्यास सांगितले आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि अनंतकाळ राहील, जय हिंद,' FADA ने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
7 / 11
ह्युंदाई आणि किया या दोघांनी या बेकायदेशीर चळवळीला पाठिंबा दिल्याने आम्हा डीलर्सना धक्का बसला आहे. दोन्ही कंपन्यांनी सर्व ट्वीट त्वरित हटवावेत. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि अनंतकाळ राहील. असं फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) चे अध्यक्ष विंकेश गुलाटी म्हणाले.
8 / 11
सोशल मीडियावर, भारतीयांनी टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा सारख्या देशांतर्गत ब्रँडचं समर्थन केलं. तसंच कंपनीला धडा शिकवण्यासाठी ह्युंदाई कारच्या ऑर्डर रद्द करण्याचे आवाहन करणाऱ्या पोस्ट पोस्टही केल्या. भारतात Hyundai ला TATA करण्याची वेळ आली आहे, असं एका युझरनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
9 / 11
भारतात गेल्या दोन दशकांपासून दुसऱ्या क्रमांकाची मोठी ऑटोमोबाईल कंपनी बनलेली ह्युंदाई भारतात जबरदस्त ट्रोल झाली. पाकिस्तानातून एक ट्वीट करण्यात आले होते. यामध्ये ह्युंदाई काश्मीरबाबत पाकिस्तानचे समर्थन करत असल्याचे म्हटले होते. हे ट्वीट Hyundai Pakistan च्या ट्विटर हँडलद्वारे करण्यात आले होते.
10 / 11
काश्मीरी बंधू आणि त्यांच्या बलिदानाचे समर्थन करुया, कारण ते स्वातंत्र्यासाठी लढत राहिले, असे या ट्विटमध्ये म्हटले होते. याचसोबत #HyundaiPakistanआणि #KashmirSolidarityDay हा हॅशटॅग देण्यात आला.
11 / 11
यामुळे सोशल मीडियावर भूकंप आला. ह्युंदाईला लोकानी कंपनीवर संताप व्यक्त करण्यास सुरूवात केली. ह्युंदाईने जगातील सर्वात मोठ्या बाजाराला समजण्यास चुकी केली, आता भारतीय कंपनीला गुढघ्यावर आणतील. काही भारतीयांनी तर ह्युंदाईच्या कार खरेदी न करण्याचेही म्हटले. ह्युंदाई पाकिस्तानच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट डिलीट करण्यात आली असली तरी त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल होऊ लागले आहेत.
टॅग्स :Hyundaiह्युंदाईKia Motars Carsकिया मोटर्सPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर