शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१ रुपयाही खर्च न करता दिवाळीला घरी आणा ३५ किमी मायलेज देणारी कार; दरमहा EMI...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2023 11:07 PM

1 / 10
भारतात सणांचा हंगाम सुरू आहे. या काळात अनेकांचे कार घेण्याचे स्वप्न पूर्ण होते. खूप कमी लोकं आहेत जे एकरकमी पैसे देऊन कार विकत घेतात, पण आपल्या खिशावरचा बोजा वाढवायचा नाही या उद्देशाने कार खरेदी करण्यासाठी फायनान्सची मदत घेणारे बरेच लोक आहेत.
2 / 10
कर्जावर कार खरेदी करताना, तुम्हाला डाउन पेमेंट म्हणून काही पैसे कंपनीला द्यावे लागतात. मात्र, डाऊन पेमेंट भरूनही अनेकांना कार खरेदी करता येत नाही. अशा लोकांसाठीच मारुती त्यांच्या बजेट कारवर शून्य डाऊन पेमेंट ग्राहकांना ऑफर करत आहे.
3 / 10
या सणासुदीच्या हंगामात, मारुती सुझुकीने त्यांच्या Celerio हॅचबॅकवर 0 डाउन पेमेंट ऑफर ग्राहकांना दिली आहे. ज्या अंतर्गत ग्राहक डीलरला एक रुपयाही न देता शोरूममधून चमकणारी Celerio कार घरी घेऊन जाऊ शकतात.
4 / 10
चला तर मग जाणून घेऊया या कारवर चालणाऱ्या फायनान्स ऑफर्सबद्दल. Celerio LXi, VXi, ZXi आणि ZXi Plus अशा चार व्हेरिएंटमध्ये विकली जात आहे. या कारचा VXi व्हेरिएंट CNG ऑप्शनसह येतो. मारुती सेलेरियो ही चार लोकांसाठी सर्वोत्तम फॅमिली कार आहे.
5 / 10
मारुती सेलेरियो ही कार त्याच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक मायलेज देणारी आहे. जर आपण मायलेजबद्दल बोललो तर कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार पेट्रोलमध्ये २५ किमी प्रति लीटर आणि सीएनजीमध्ये ३५ किमी प्रति किलो मायलेज देते.
6 / 10
Maruti Suzuki Celerio किंमत ५ लाख ३७ हजार रुपयांपासून सुरू होते आणि ७ लाख १४ हजार रुपये (एक्स-शोरूम किंमत) पर्यंत जाते. भारतीय बाजारपेठेत या कारची टक्कर टाटा टियागो, टाटा पंच आणि सिट्रोएन सी३ सोबत आहे.
7 / 10
फायनान्स ऑप्शन बद्दल बोललो, तर तुम्ही या दिवाळीत एक रुपयाही न भरता Celerio कार खरेदी करू शकता. मारुती सेलेरियोची एक्स-शोरूम किंमत ५.३७ लाख रुपयांपासून सुरू होते. तुम्ही त्याचे बेस मॉडेल विकत घेतल्यास, त्याची ऑन-रोड किंमत ५.९० लाख रुपयांपेक्षा थोडी जास्त असेल.
8 / 10
शून्य डाउनपेमेंटमुळे तुम्हाला उर्वरित पूर्ण रकमेसाठी कर्ज घ्यावे लागेल. तुम्ही साधारण ८ टक्के व्याजदराने ७ वर्षांसाठी कर्ज घेतल्यास, मासिक हप्ता ९,२०१ रुपये असेल. तुम्ही कार कर्जावर १,८२,५५१ रुपये व्याज म्हणून द्याल आणि ७ वर्षांत तुम्हाला एकूण ७,७२,८६७ रुपये भरावे लागतील.
9 / 10
जवळपास सर्व बँका आणि NBFC मारुती सेलेरियो वर कर्ज देत आहेत. दिवाळीत अनेक बँका कर्जावरही ऑफर देतात. मात्र तुमचा क्रेडिट स्कोअर आणि आर्थिक स्थिती लक्षात घेऊनच बँका त्यांच्या स्वतःच्या अटी व शर्तींवर कर्ज देतात.
10 / 10
मारुती सेलेरियो ही 5 सीटर कार आहे. यामध्ये 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम (Android Auto आणि Apple CarPlay सह), इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण, स्टीयरिंग व्हील माउंटेड ऑडिओ कंट्रोल्स, पॅसिव्ह कीलेस एंट्री, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टर्न इंडिकेटर्स देण्यात आले आहेत.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीDiwaliदिवाळी 2023