शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

३ लाखांपेक्षा कमी किंमतीत घरी आणा Maruti Ertiga CNG, पाहा किती असेल EMI?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 4:09 PM

1 / 8
जर तुम्ही अशी कार शोधत असाल ज्यामध्ये ७ जण सहज प्रवास करू शकतील आणि ती कार CNG वर चालत असावी, तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. होय, कारण आज आम्ही येथे अशा कारबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुमचं संपूर्ण कुटुंब बसून सहज प्रवास करू शकते आणि तिचे मायलेज 26 किमी प्रति किलो पर्यंत आहे.
2 / 8
त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल कारपेक्षा यासाठी कमी खर्च येतो. ही कार तुम्ही सीएनजीवर शिफ्ट करून तुम्हाला हवी तेव्हा चालवू शकता आणि सीएनजी संपल्यास तुम्ही पेट्रोलमध्ये चालवू शकता. आम्ही मारुती सुझुकीच्या 7-सीटर Ertiga CNG (VXI) बद्दल बोलत आहोत. तर आता या कारची किंमत, डाउनपेमेंट आणि EMI बद्दल जाणून घेऊया.
3 / 8
तुम्हाला मारुती सुझुकी अर्टिगा सीएनजीचे बेस व्हेरिएंट खरेदी करायचे असल्यास, तुम्हाला मारुती अर्टिगा VXI (O) CNG 1.5L 5MT व्हेरिएंट मिळेल, ज्याची एक्स-शोरूम किंमत (उत्तर प्रदेश, लखनौ) 10,58000 रुपये आहे.
4 / 8
तर, या कारच्या ऑन-रोड किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, या कारची किंमत तुम्हाला 1215089 रुपये असेल. ज्यामध्ये नोंदणी शुल्क, विमा, 5 वर्षांची एक्सटेंडेड वॉरंटी, बेसिक किट, ऑटोकार्ड यांचा समावेश आहे.
5 / 8
आता जर Maruti Suzuki Ertiga VXI CNG च्या डाउनपेमेंट आणि EMI बद्दल बोलायचं झालं तर कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला अंदाजे 2,67089 रुपयांचे डाउनपेमेंट करावं लागेल.
6 / 8
त्यानंतर 9,48,000 रुपयांचं तुम्हाला लोन घ्यावे लागेल. यानंतर, तुम्हाला 8.6 टक्के व्याज दराने 5 वर्षांसाठी दरमहा 19,495 रुपयांचा चा EMI भरावा लागेल (व्याज दर भिन्न असू शकतो.)
7 / 8
जर तुम्हाला 7 वर्षांचा EMI हवा असेल, तर तुम्हाला 8.6 टक्के व्याज दराने 7 वर्षांसाठी दरमहा 15,061 चा EMI भरावा लागेल. तुम्ही 84 महिन्यांचा EMI केल्यास, तुम्हाला अंदाजे 3,17,099 रुपये व्याज म्हणून द्यावे लागतील. म्हणून, लोकांना जास्तीत जास्त डाउनपेमेंट करण्याचा आणि कमीत कमी दिवसांत कर्ज कमी करण्याचा सल्ला दिला जातो.
8 / 8
तथापि, तुमच्या सिबिल स्कोअरवर अवलंबून कर्जाची रक्कम आणि लागू होणारे व्याजदर देखील भिन्न असू शकतात. तुमचा CIBIL स्कोअर 784 किंवा त्याहून अधिक असल्यास, तुम्ही SBI कडून 8.62 टक्के दराने लोन मिळू शकतं. तुम्ही कार इन्शुरन्स, RTO आणि एक्स-शोरूम किंमतीचे 80 ते 86 टक्के फायनान्स मिळवू शकता.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकी