शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एक लाख रुपये देऊन घरी आणा टॉप सेलिंग कार Maruti Dzire VXI; लोन अन् EMI पहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 11:07 AM

1 / 7
देशात हॅचबॅकनंतर कॉम्पॅक्ट सेदानने चांगलाच जम बसविलेला आहे. सध्या ग्राहकांचा ओढा कॉम्पॅक्ट एसयुव्हींकडे असला तरी सेदानसाठी काही कमी मागणी नाहीय. खिशाला परवडणारी किंमत, मायलेज आणि जास्त मोठी नाही, जास्त लहान नाही अशी हा सेगमेंट सामान्यांना अधिक पसंतीचा आहे. या सेगमेंटमध्ये सर्वच आघाडीच्या कंपन्यांच्या कार असल्या तरी मारुतीच्या कारला मोठी पसंती असते.
2 / 7
मारुती सुझुकीची डिझायर या सेगमेंटमधील टॉप सेलिंग कार आहे. ही कार तुम्ही एक लाख रुपये डाऊनपेमेंट करून घरी नेऊ शकता. या कारचे LXi, VXi, ZXi आणि ZXi+ अशा चार ट्रिम लेव्हलचे ९ व्हेरिअंट आहेत. या कारची किंमत 6.24 लाख रुपये ते 9.18 लाख रुपये (एक्स शोरूम) आहे.
3 / 7
महत्वाचे म्हणजे पेट्रोलसोबत सीएनजीमध्येही ही कार उपलब्ध आहे. पेट्रोल डिझायरचे मायलेज 24.12 kmpl आणि सीएनजी व्हेरिअंटचे मायलेज हे 31.12 km/kg पर्यंत आहे. हा कंपनीचा दावा आहे.
4 / 7
मारुति सुजुकी डिझायरचे सर्वाधिक खपाचे व्हेरिअंट हे डिझायर व्हीएक्सआय आहे. या व्हेरिअंटची एक्स शोरुम किंमत 6.24 लाख रुपये आणि ऑन-रोड प्राईज 8,18,043 रुपये आहे. ही दिल्लीतील किंमत आहे. महाराष्ट्रात डिझायरची किंमत थोडी वाढते. जर तुम्ही कर्जावर गाडी घेत असाल तर १ लाख रुपये डाऊनपेमेंट करावे लागणार आहे.
5 / 7
डिझायरसाठी तुम्हाला ५ वर्षांसाठी ९ टक्के व्याजदराने 7,18,043 रुपये कर्ज मिळेल. यासाठी तुम्हाला पुढील ६० महिने 14,905 रुपये ईएमआय भरावा लागेल. म्हणजेच तुम्हाला गाडीच्या किंमतीवर 1.76 लाख रुपये व्याज भरावे लागेल.
6 / 7
मारुती सुझुकी डिझायर VXI ऑटोमॅटिकची एक्स-शोरूम किंमत 7.7 लाख रुपये आणि ऑन-रोड किंमत 8,72,736 रुपये आहे. 1 लाख रुपये डाऊनपेमेंट केल्यास तुम्हाला 7,72,736 रुपये कर्जाची रक्कम मिळेल. 5 वर्षांसाठी 9% व्याजदराने फायनान्स केले तर तुम्हाला पुढील 60 महिन्यांसाठी दरमहा 16,041 रुपये EMI भरावा लागेल. 1.9 लाख रुपये व्याज द्यावे लागेल.
7 / 7
हे दिल्लीतील दर असून महाराष्ट्रात तुमच्या जवळच्या शोरुममध्ये तुम्हाला त्यापेक्षा चांगला व्याजदर, कारवर ऑफर आदी मिळू शकते. यामुळे ईएमआय कमी किंवा डाऊनपेमेंटही कमी होऊ शकते.
टॅग्स :MarutiमारुतीMaruti Suzukiमारुती सुझुकी