Briza, Creta, Nexon will hit by this car...Mahindra will launch soon
ब्रिझा, क्रेटाला टक्कर देणार ही कार....महिंद्रा करणार धमाका... By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 7:39 PM1 / 8मुंबई : भारतातील तिसरी सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी महिंद्रा आणि महिंद्रा लवकरच मारुतीच्या ब्रिझा आणि ह्युंदाईच्या क्रेटाला कडवी स्पर्धा निर्माण करणार आहे.2 / 8सब कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटच्या या कारचे नाव S201नामकरण केले आहे. मात्र, ही कार XUV300 या नावाने लाँच केली जाण्याची शक्यता आहे. एका कार्यक्रमादरम्यान कंपनीने या कारचे डिझाईन समोर आणले होते. 3 / 8XUV300 ही कॉम्पॅक्ट एसयुव्ही कार येत्या फेब्रुवारीमध्ये लाँच होणार आहे. XUV300 ला कंपनीने SsangYong Tivoli च्या प्लॅटफॉर्मवर बनविले आहे जिला 2016 च्या ऑटो एक्स्पोमध्ये लाँच करण्यात आले होते. यामध्ये x100 चा वापर करण्यात आला आहे.4 / 8या कारचे डिझाईन चित्त्यापासून प्रभावित असल्याचे सांगितले जात आहे जे बऱ्याच बाबतीत XUV500 सारखी दिसते. 5 / 8महिंद्राने नुकतीच मराजो ही युटीलिटी कार शॉर्क माशाच्या आकारासारखी बनविली होती. महिंद्रा पुढील वर्षापर्यंत जुन्या कार बदणार असून ताज्या दमाच्या कार भात्यात ठेवणार आहे. टाटा मोटर्सनेही त्यांच्या जुन्या कार बदलण्यास सुरुवात केली आहे.6 / 8महिंद्राने नुकतीच कमी किंमतीत एक्सयुव्ही अल्टुरास लाँच केली आहे. नव्याने येणाऱ्या XUV300 मध्ये कंपनीने या श्रेणीमध्ये इतर कंपन्यांकडे नसलेली फिचर्स दिली आहेत. ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, 7 एअरबॅग, 4 डिस्क ब्रेक, सनरुफ, मोठी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे. 7 / 8या नव्या कॉम्पॅक्ट एसयुव्हीमध्ये XUV300 या कारमध्ये 1.5 लीटरचे डिझेल आणि 1.2 लीटरचे पेट्रोल इंजिन असणार आहे. हे इंजिन महिंद्राने SsangYong कंपनीच्या सहकार्याने बनविले आहे. दोन्ही इंजिनांमध्ये 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन असणार आहे. 8 / 8या कारची किंमत 8 लाख ते 12 लाख रुपये असणार आहे. महिंद्रा मारुतीच्या नेक्सासारखे नवे विक्री दालन उघडणार आहे. 'महिंद्रा न्यू वर्ल्ड ऑफ एसयूवी' असे याचे नाव असणार आहे. कदाचित ही नवी कार या दालनातून विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. महिंद्रा या कारची इलेक्ट्रीक कारही 2020 मध्ये आणण्यात येणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications