शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बीएस 6 वाहन घेताय? मग ही काळजी जरूर घ्या! नाहीतर खिसा रिकामा होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 1:53 PM

1 / 12
येत्या 1 एप्रिलपासून BS6 मानांकनाची वाहने विक्री केली जाणार आहेत. यामुळे सर्वच कंपन्यांनी बीएस6 वाहने लाँच करण्याता सपाटा लावला आहे.
2 / 12
या नवीन श्रेणीतील वाहनांमुळे प्रदूषण कमालीचे घटणार आहे. मात्र, याचबरोबर नीट काळजी न घेतल्यास खिसाही कापला जाणार आहे.
3 / 12
बीएस4 आणि बीएस 6 या प्रकारातील वाहनांमध्ये मोठा फरक हा कार्बुरेटरचा आहे. कारण नवीन उत्सर्जन मानकांच्या गाड्यांमध्ये फ्यूअल इंजेक्शन सिस्टिम देण्यात आली आहे. छोट्यातील छोट्या वाहनांमध्येही ही प्रणाली लावण्यात आली आहे.
4 / 12
जर तुमच्याकडे बीएस 6 चे वाहन असेल किंवा घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला खूप सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
5 / 12
अजून या वाहनांच्या विक्रीला अंशत: सुरुवात झालेली असल्याने या वाहनांचे सर्व्हिस सेंटर उपलब्ध नाहीत.
6 / 12
नुकतेच काही पेट्रोल पंपांवर बीएस6 चे इंधन उपलब्ध करण्यात आलेले आहे. कंपन्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्येही प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी नाहीत. यामुळे बाहेरील गॅरेजमध्ये माहितगार मॅकॅनिकही मिळणे कठीण आहे.
7 / 12
सर्वात आधी तुम्हाला इंधन भरताना काळजी घ्यावी लागणार आहे. टाकीला आतमध्ये गंज पकडता नये, यासाठी पाणी मिश्रीत पेट्रोल आतमध्ये जाता नये.
8 / 12
चुकुनही जर इंधनाच्या टाकीमध्ये पाणी किंवा अन्य कोणतेही द्रव्य गेले तर फ्युअल इंजेक्टर बंद पडणार आहेत. ही समस्या कार्ब्युरेटरसोबत होत नाही.
9 / 12
सर्वात महत्वाचा खर्चिक भाग म्हणजे हे इन्जेक्टर कोणत्याही वॉरंटीमध्ये बदलून मिळत नाहीत. यामुळे ते खराब झाल्यास तुम्हाला खिशातून पैसे मोजावे लागणार आहेत.
10 / 12
चांगल्या आणि माहिती असलेल्या पेट्रोल पंपावरच इंधन भरावे लागणार आहे. कारण इंधनात भेसळ असल्यास त्याचा थेट परिणाम इंजेक्टरच्या आयुष्यावर होणार आहे. तसेच धुळ-माती आदींपासूनही या इंजेक्टरला धोका आहे.
11 / 12
इंजेक्टरमध्ये काही खराबी आल्यास त्याची सूचना तुमच्या स्कूटर, कारच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर मिळते. यासाठी तिथे इंडिकेटर देण्यात आलेला आहे.
12 / 12
इंजेक्टरमध्ये काही खराबी आल्यास त्याची सूचना तुमच्या स्कूटर, कारच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर मिळते. यासाठी तिथे इंडिकेटर देण्यात आलेला आहे.
टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगenvironmentपर्यावरण