शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कार घ्यायची म्हणून घेता आणि नुसती उभी करून ठेवता? ही काळजी घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 1:41 PM

1 / 7
अनेकजण कार नुसती घ्यायची म्हणून घेतात आणि महिनोंमहिने पार्किंगमध्येच उभी करून ठेवतात. यात त्या कार कंपन्यांचा फायदा होतो आणि हे ईएमआय भरत बसतात. नंतर जेव्हा हीच कार चालवतात तेव्हा त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
2 / 7
जर तुम्ही देखील खूप काळासाठी कार पार्क करून ठेवत असाल तर तुम्ही कोणती काळजी घ्यायला हवी? चला पाहुया...
3 / 7
जेव्हा जास्त वेळ गाडी उभी करावी लागते तेव्हा गाडी उघड्यावर उभी करू नये. उघड्यावर किंवा झाडाखाली पार्किंग केल्याने गाडी खराब होण्याचा तसेच नुकसान होण्याचा धोका वाढतो. तुम्ही कार फक्त झाकलेल्या पार्किंगमध्ये पार्क करण्याचा प्रयत्न करा. असे केल्यास कारला चोरीपासून तसेच हवामानाच्या प्रभावापासून वाचवता येईल.
4 / 7
कार जास्त काळ वापरायची नसेल तेव्हा कारच्या बॅटरीचे कनेक्शन काढून टाकावे. असे केल्याने, बॅटरीचे आयुर्मान तर वाढवता येतेच, परंतु गरजेच्या वेळी बॅटरी डिस्चार्ज होण्याच्या समस्येपासूनही सुटका होते. बॅटरी कनेक्शन काढून टाकल्यामुळे, कारमध्ये इलेक्ट्रिकल समस्या उद्भवत नाही.
5 / 7
नेहमी गाडी स्वच्छ करूनच पार्क करावी. कारण कार वापरताना अनेक वस्तू आणि खाद्यपदार्थ गाडीतच राहतात. खूप दिवस गाडी तशीच विनावापर राहणार असल्याने या गोष्टी खराब होतात आणि काही वेळा अन्नामुळे गाडीत उंदीर वगैरे येण्याचा धोका असतो.
6 / 7
गाडी जास्त वेळ उभी करावी लागते तेव्हा गाडीच्या खिडक्या किंचित उघडून ठेवाव्यात. त्यामुळे कारमध्ये गॅस तयार होत नाही आणि ताजी हवा आत येत असल्याने गाडीमध्ये दुर्गंधी येण्याची समस्या उद्भवत नाही.
7 / 7
खूप दिवसांसाठी कार पार्क करत असाल तर ती कव्हरने झाकायला हवी. याने धुळीपासून तुमच्या कारचे संरक्षण होईल. कारच्या रेडिएटर आणि इंजिन इत्यादीपर्यंत धूळ पोहोचणार नाही आणि रेडिएटर चोक सारख्या समस्या देखील टाळता येतील.
टॅग्स :carकार