शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Online खरेदी करा आणि घरी डिलिव्हर होईल OLA Electric स्कूटर; कंपनीच्या सीईओंचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 4:52 PM

1 / 15
भारतीय बाजारपेठेत लवकरच OLA Scooter लाँच होण्याच्या तयारीत आहे. लाँच पूर्वीच या स्कूटरबाबत ग्राहकांमध्ये उस्तुकता असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये आपल्या सेगमेंटचे अनेक फीचर्स देण्यात येणार असल्याचा दावाही कंपनीनं केला आहे.
2 / 15
ओलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल सोशल मीडिया पोस्टद्वारे एक एक करून स्कूटरच्या डिटेल्स शेअर करत आहेतय पहिले त्यांनी स्कूटरच्या कलर ऑप्शन आमि टॉप स्पीडबाबत संकेत दिले होते. आता त्यांनी या स्कूटरच्या विक्रीच्या पर्यायाबाबत माहिती दिली आहे.
3 / 15
अनेक रिपोर्ट्सनुसार ओला इलेक्ट्रीक व्हेईकलची विक्री ही टेस्लाच्या मॉडेलप्रमाणे केली जाणार आहे. ज्यानुसार त्यांचे कोणतेही डिलिव्हरी पार्टनर्स नसतील आणि त्याच्याऐवजी ऑनलाईन बुकिंग घेतलं जाईल.
4 / 15
यादरम्यान, भाविश अग्रवाल यांनी शुक्रवारी ट्विटरवर ग्राहकांना ही स्कूटर कोणत्या पद्धतीनं तुम्ही विकत घेऊ इच्छिता असा सवालही केला.
5 / 15
यामध्ये होम डिलिव्हरी आणि फिजिकल स्टोअर असे ऑप्शन देण्यात आले होते. आतापर्यंत ६० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी वोट केलं असून ऑनलाईन हा पर्याय स्वीकारला आहे.
6 / 15
ओला इलेक्ट्रीक स्कूटरने येण्याआधीच भारतीय बाजारात मोठा कल्लोळ माजविला आहे. ग्राहक आगाऊ बुकिंगवर एवढे तुटून पडले की, पहिल्याच दिवशी 1 लाखांचा आकडा पार झाला होता. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर बुकिंग मिळविणारी ही जगातील पहिलेच वाहन ठरले आहे.
7 / 15
आता लोकांना उत्सुकता आहे ती, ही स्कूटर कधी लाँच होणार, किंमत किती असणार आणि काय काय फिचर्स मिळणार, याची. चला जाणून घेऊया, स्कूटर खरेदीच्या या नव्या ट्रेंडबाबत.
8 / 15
यापूर्वी फर्स्टपोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार Ola Electric आपल्या Series-S स्कूटरच्या डिलिव्हरीसाठी ‘डायरेक्ट-2-कंज्यूमर’ (D2C) मॉडेल अवलंबणार आहे. थेट ग्राहकाच्या घरी नेऊन ही स्कूटर दिली जाणार आहे.
9 / 15
महत्वाचे म्हणजे Ola Electric व्हेईकल मॅन्युफॅक्चरर कंपनी नाही तर टेक मोबिलिटी स्टार्टअप म्हणून संबोधत आहे. ओला स्कूटर केवळ घरी डिलिव्हर केली जाणार नाही, तर पुढच्या सर्व्हिसेस देखील दारातच येऊन दिल्या जाण्याची शक्यता आहे. यामुळे डीलरशीपचे पैसे वाचणार आहेत.
10 / 15
Ola Scooter च्या डोअरस्टेप डिलिव्हरीसाठी Ola Electric वेगळे लॉजिस्टिक डिपार्टमेंट बनविणार आहे. हा विभाग ग्राहकांसाठी थेट खरेदी, डॉक्युमेंटेशन आणि कर्जासह अन्य सुविधा पुरवणार आहे.
11 / 15
लक्झरी कार बनविणारी कंपनी Mercedes-Benz आणि Jaguar Land Rover ने नुकतीच कारची होम डिलिव्हरी सुरु केली आहे. मात्र, ओला ही अशी पहिलीच कंपनी ठरणार आहे, जी एवढ्या मोठ्या प्रमाणावर होम डिलिव्हरी मॉडेल वापरणार आहे.
12 / 15
Ola Scooter ची दोन मॉडेल बॅटरी पॅकनुसार बाजारात येण्याची शक्यता आहे. Ola S1 आणि Ola S2 अशी ही दोन मॉडेल आहेत. यांची किंमत 80 हजार आणि 1.10 लाख रुपये असण्याचा अंदाज आहे.
13 / 15
ओलाचा बंगळरुमध्ये जगातील ईस्कूटरचा सर्वात मोठा कारखाना उभा राहणार आहे. 500 एकर जमिनीवर 2,400 कोटी रुपये खर्च करून ही फॅक्टरी उभी केली जात आहे. यामध्ये वर्षाला 2 लाख स्कूटरचे उत्पादन केले जाणार आहे.
14 / 15
ओलाची ही स्कूटर Etergo AppScooter वर आधारीत असे. या स्कूटरमध्ये उच्च क्षमतेची स्वॅपेबल बॅटरी येते. परंतू ओलामध्ये एकच फिक्स बॅटरी असेल. तसेच 240 किमीची रेंज सांगतिली जात असली तरी प्रत्यक्षात 150 किमीची रेंज मिळण्याची शक्यता आहे.
15 / 15
ओला स्कूटरला चार्ज करण्यासाठी ओला स्टेशनवर अडीच तास, घरी केल्यास पाच तास लागण्याची शक्यता आहे. तसेच हायपर चार्जिंग स्टेशनवर बॅचरी केवळ 18 मिनिटांत 50 टक्के चार्ज होणार आहे.
टॅग्स :Olaओलाelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनscooterस्कूटर, मोपेडIndiaभारतTwitterट्विटर