शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Used Electric Car for Sale Buy: स्वस्तात मिळतेय म्हणून सेकंड हँड ईलेक्ट्रीक कार, स्कूटर घ्यायची का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 1:03 PM

1 / 6
भारतीय बाजारात ईलेक्ट्रीक कार, स्कूटरनी पाऊल ठेवून आता तीन-चार वर्षे झाली आहेत. पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढल्याने लोक आता मोठ्या प्रमाणावर ईलेक्ट्रीक वाहनांकडे वळू लागले आहेत. यामुळे आता सेकंड हँड ईव्ही कार आणि स्कूटरदेखील बाजारात मिळू लागल्या आहेत. या वाहनांना रिसेल व्हॅल्यू जरी कमी असली तरी त्या घ्यायच्या की नाही यावर मतमतांतरे आहेत. (Second hand electric cars For Sale)
2 / 6
सध्यातरी इलेक्ट्रीक वाहने घेणे महागच आहे. यामुळे लोक कमी किंमतीत वापरलेली ईव्ही कार किंवा स्कूटर मिळतेय का ते पाहत आहेत. परंतू, अशी वाहने घेताना काही गोष्टी विचारात घ्याव्या लागणार आहेत. चार वर्षांपूर्वी जी वाहने आली होती, त्यापेक्षा जास्त रेंज, फिचर्स आता मिळू लागली आहेत. यामुळे जुने ग्राहक ही वाहने विकून दुसरी घेण्याचा विचार करत आहेत. त्यांच्याकडे पैसा आहे. पण आपण आपला पैसा जुन्या वाहनांमध्ये गुंतवायचा का?
3 / 6
जर तुम्ही एक चांगली वापरलेली इलेक्ट्रीक कार खरेदी करायचा विचार करत असाल तर थोडं कठीणच आहे. ईलेक्ट्रीक कार या आयसी इंजिनच्या कारपेक्षा आजही कमी प्रमाणावर विकली जात आहेत. त्यामुळे बाजारात सध्या पर्याय फार कमी आहेत. तुम्ही निवडत असलेली ईलेक्ट्रीक कार किती वापरलेली आहे, कशी वापरलेली आहे हे पाहणे गरजेचे आहे.
4 / 6
भारतात इलेक्ट्रिक वाहनांसाठीचे इन्फ्रास्ट्रक्चर चांगले नाहीय. परंतु डिझेल कार किंवा पेट्रोल कारच्या तुलनेत इलेक्ट्रिक कार महागही नाहीत. नवीन कार घेताना जर विचार केला तर इंधनावर जो पैसा तुम्ही खर्च करणार आहात तो वाचणार आहे. तोच पैसा तुम्हाला वळता करता येणार आहे. चार्जिंग स्टेशन ही शहरांत आहेत. यामुळे शहरात घेणार असाल तर फायद्याची आहे. परंतू, गावाकडे किंवा निमशरहरी भागात तुमच्या आवाक्यात प्रवास असेल तरी देखील विचार करता येईल.
5 / 6
पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या तुलनेत वापरलेल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती झपाट्याने घसरतात. म्हणजेच रिसेल व्हॅल्यू नाही. इलेक्ट्रिक वाहने सेकंड हँड खरेदी केली तर ती स्वस्त आहेत. ईव्हीसोबत रेंजची समस्या असते. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आवाज नसतो, स्मूथ ड्राईव्ह मिळते.
6 / 6
युज्ड कार मार्केटमध्ये EV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधीच्या मालकाने ती का विकली याचा शोध घ्या. साधारण साठ सत्तर हजार किमीनंतर बॅटरी ड्रॉपची समस्या येते. काही कंपन्या तीन ते सात वर्षांची बॅटरीवर वॉरंटी देतात. ही वॉरंटी किती शिल्लक आहे ते देखील तपासा. कारची सर्व्हिसिंग वेळेवर झालीय का हे देखील तपासा. बॅटरी जर खराब झाली तर सेकंड हँड कारपेक्षा बॅटरीचीच किंमत जास्त असेल. मोटर देखील महागच असते. यामुळे याचा सारासार विचार करून सेकंड हँड ईव्ही कार घ्या....
टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर