BYD Atto 3: Electric car with 521KM range launched in India, book for just 50 thousand...
BYD Atto 3: जाम भारी! 521KM रेंज वाली इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च, फक्त 50 हजारात करा बुकिंग... By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 5:02 PM1 / 10 BYD Atto 3 Price and Features: चीनी कार कंपनी BYD (Build Your Dreams) ने भारतात आपली दुसरी इलेक्ट्रिक कार BYD Atto 3 लॉन्च केली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक एसयूव्ही फुल चार्जमध्ये 521KM ची रेंज देईल. कंपनीने या गाडीची किंमत अद्याप सांगितलेली नाही.2 / 10 पण, याची बुकिंग आजपासून सुरू झाली आहे. ग्राहक फक्त 50 हजार रुपयांमध्ये ही गाडी बूक करू शकतात. याच्या किमतीची घोषणा डिसेंबरमध्ये होण्याचा अंदाज आहे. भारतात BYD Atto 3 चा सामना MG ZS EV आणि Hyundai Kona EV सारख्या गाड्यांसोबत असेल.3 / 10 या गाडीच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, गाडीला समोरुन एलईडी हेडलँप्ससोबत कनेक्टिंग LED बार दिले आहेत. याशिवाय समोर सेंसर्स आहेत. परंतू, यात फॉगलँप्स दिले नाहीत. गाडीत 18 इंचाचे अलॉय व्हील आहेत.4 / 10 Atto 3 ची लांबी 4455mm, रुंगी 1875mm आणि उंची 1615mm आहे. याचे व्हीलबेस 2720mm आहे. ही गाडी चार कलर ऑप्शन ब्लू, बोल्डर ग्रे, स्की व्हाइट आणि पार्कौर रेडमध्ये मिळेल.5 / 10 गाडीतील टेक्नॉलॉजीबद्दल सांगायचे झाल्यावर, गाडीत Android Auto आणि Apple CarPlay सपोर्टसह 12.8-इंचाचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम आहे. या6 / 10 तर फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील्स, 5-इंच डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, 360 डिग्री कॅमेरा, पॅनोरमिक सनरूफ, 6-वे पॉवर अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, 4-वे अॅडजस्टेबल फ्रंट पॅसेंजर सीट आणि व्हायरलेस चार्जिंगसारखे फीचर्स मिळतील.7 / 10 BYD Atto 3 इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये 60.48kwh ची बॅटरी पॅक आहे. ही बॅटरी ARAI सर्टिफाइड 521 KM ची रेंज ऑफर करते. पॉवरबाबत सांगायचे झाल्यास, याची मोटर 201bphची पॉवर आणि 310Nm चा टॉर्क जेनरेट करते.8 / 10 कंपनीने सांगितले की, गाडीत ब्लेड बॅटरी टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. हे तंत्रज्ञान इतर बॅटरींच्या तुलनेत जास्त सुरक्षित आहे. या गाडीला डीसी फास्ट चार्जरने 0 ते 80 टक्के चार्ज करण्यासाठी फक्त 50 मिनीटांचा वेळ लागेल. 9 / 10 कारमध्ये लेव्हल 2 ADAS सिस्टीम दिले आहेत, ज्यात अॅडॅप्टिप क्रूज कंट्रोल आणि इमेरजेंसी ब्रेकिंगसारखे फीचर्स आहेत. एखादा व्यक्ती कारच्या समोर आल्यावर, गाडी आपोआप ब्रेक लावते. यात टेलगेटसाठी इलेक्ट्रिक ओपनिंग मिळते. 10 / 10 सेफ्टीसाठी नवीन BYD Atto 3 इलेक्ट्रिक SUV मध्ये 7 एअरबॅग, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल, सीट बेल्ट रिमायंडर सिस्टीम आणि स्पीड अलर्ट सिस्टीम दिले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications