BYD Seal: Range 700km; Entry of this powerful EV car in India before Tesla, know the price
रेंज 700km; Tesla च्या आधी भारतात 'या' दमदार EV कारची एन्ट्री, जाणून घ्या किंमत... By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 8:43 PM1 / 5 Electric Car India : इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये Tesla आणि BYD यांच्यातील ‘वैर’ सर्वश्रुत आहे. जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी बनण्याच्या शर्यतीत दोन्ही कंपन्या एकमेकांना 'टफ फाईट' देतात. आता ही स्पर्धा भारतात पाहायला मिळणार आहे. टेस्ला भारतात कधी येणार, याबाबत कुठलीही स्पष्टता नाही, पण BYD लवकरच भारतीय बाजारपेठेत एन्ट्री घेणार आहे. 2 / 5 मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोड टेस्टिंगदरम्यान BYD Seal स्पॉट झाली. असे मानले जात आहे की, या इलेक्ट्रिक सेडानची विक्री मार्च 2024 पासून सुरू होऊ शकते. BYD ची भारतातील ही तिसरी कार असेल. याआधी कंपनी Atto 3 SUV आणि e6 MPV विकत आहे. विशेष म्हणजे, कंपनीने ऑटो एक्सपो 2023 मध्ये भारतात प्रथमच BYD सील सादर केली होती.3 / 5 BYD Seal : फीचर्स-BYD सील 15.6-इंच फिरत्या इन्फोटेनमेंट डिस्प्लेसह येते. ड्रायव्हरसाठी स्वतंत्र 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि हेड-अप डिस्प्ले असेल. सेंट्रल एसी व्हेंट फ्लोटिंग टचस्क्रीनसह येतील. इंटीरियरमध्ये ग्लॉस ब्लॅक इन्सर्ट देण्यात आले आहेत. दरवाजाच्या हँडलवर स्पीकर बसवले आहे. Atto 3 SUV मध्ये देखील असेच दिसून येते.4 / 5 BYD Seal : बॅटरी आणि रेंज-आंतरराष्ट्रीय बाजारात BYD Seal दोन बॅटरी पॅक पर्यायांसह येते. याचे 61.4kWh व्हर्जन पूर्ण चार्ज केल्यावर 500 किमीची रेंज देते. तर, 82.5kWh व्हर्जन एका चार्जवर 700 किमी पर्यंत रेंज देते. दोन्ही मॉडेल्समध्ये बीवायडीच्या ब्लेड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.5 / 5 BYD Seal : लॉन्च आणि किंमत-भारतातील डीलर्सनी सीलसाठी अनधिकृत बुकिंग घेणे सुरू केले आहे. कारची किंमत जाहीर केली जाईल तेव्हा डिलिव्हरी देखील सुरू होईल. त्याच्या संभाव्य किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, BYD सीलची किंमत सुमारे 50 लाख रुपये असू शकते. जागतिक स्तरावर BYD ची स्पर्धा टेस्लाशी आहे, तर सध्या भारतात ही कार Kia EV6 आणि Hyundai Ioniq 5 शी स्पर्धा करेल. आणखी वाचा Subscribe to Notifications