1 / 10Car Loan Lowest Interest Rate: काही दशकांपूर्वी जर कार किंवा अन्य कोणतेही वाहन घ्यायचे असेल तर ज्यांच्या हाती पैसा आहे त्यांनाच ते शक्य होते. कारण बँका तेव्हा कारवर कर्ज देत नसायच्या. यामुळे ज्याच्या हाती थप्प्या तोच एकरकमी कार घेऊ शकत होता. (Cheapest car loan from banks.)2 / 10आज परिस्थिती बदलली आहे. आज अनेकजण 100 टक्के लोन काढून कार घेऊ शकत आहेत. आता तर लोनवर घरातील सामानही घेता येतेय. हा बाजार मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे. आता कोणत्या बँकेचा किती कमी व्याजदर हे पाहिले जाते. 3 / 10बँकांना त्यांचा पैसा गुंतवायचा आहे. यामुळे बँका कमी व्याजदरावर, कमी प्रोसेसिंग फी किंवा शून्य प्रोसेसिंग फीवर आरामात लोन देत आहेत. खासगी बँका तर ग्राहकांना सोईचे असेल त्या पद्धतीने कर्ज देत आहेत. 4 / 10आज आम्ही तुम्हाला काही अशा बँका सांगणार आहोत, ज्यांच्याकडून तुम्ही कमी व्याजदराने, कमी प्रोसेसिंग फी आणि ईएमआयवर तुमचे पैसे वाचवू शकणार आहात. (Lowest car loan bank list)5 / 10तुम्हाला बँकेकडून 10 लाख रुपयांचे वाहन कर्ज ते देखील 7 वर्षांच्या कालावधीसाठी घ्यायचे असेल, तर त्यावर बँकेच्या व्याज दरानुसार ईएमआय द्यावा लागतो. 6 / 10सध्या सर्वात कमी व्याजदर हा पंजाब अँड सिंध बँकेचा आहे. बँकेच्या वेबसाईटनुसार बँक तुम्हाला 7.0% व्याजदराने कर्ज देणार आहे. याचसोबत तुम्हाला प्रोसेसिंग फीवर 50 टक्क्यांची सूट मिळणार आहे. ही ऑफर 30 जूनपर्यंत लागू असणार आहे. (Punjab and sindh bank chepest car loan.)7 / 10यानंतर दुसऱ्या क्रमांकावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा आहेत. या बँका 7.25 टक्के दराने वाहन कर्ज देतात. (central bank of india car loan, Bank of badoda car loan)8 / 10वाहन खरेदी ही ऐच्छिक असते, उपभोग घेण्यासाठी केलेले कार्य असल्याने सरकारकडून यामध्ये काही खास सूट दिली जात नाही. बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँक शैक्षणिक कर्ज सर्वात स्वस्त देतात. 9 / 10खासगी बँकांमध्ये आयडीबीाय बँक सर्वात स्वस्त कार लोन देतेय. वेबसाईटनुसार 7.50 टक्के व्याज आकारते. यानुसार 10 लाखांच्या कार लोनचा ईएमआय जवळपास 15,340 रुपये होतो. 10 / 10लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे 7 ते 8 टक्क्यांमध्ये बँका वाहन कर्ज जरी देत असल्या तरी देखील या व्याजदराच्या फरकामुळे तुमचा मासिक ईएमआय हा 700 रुपयांनी प्रभावित होतो. कमी व्याजदर 700 रुपये कमी ईएमआय, जास्त व्याजदर 700 रुपयांनी जादा ईएमआय असे हे गणित आहे.