शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Car: ड्रायव्हिंग शिकण्यासाठी सेकंड हँड कार खरेदी करताय? तर अशी चूक करू नका, होईल नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 2:12 PM

1 / 6
कार खरेदी करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. मात्र कार चालवणं शिकणं हे अनेकांसाठी कठीण ठरतं. त्यामुळे जेव्हा कधी कार ड्रायव्हिंग शिकाल तेव्हा जुन्या कारचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. त्याचं कारण म्हणजे शिकताना नव्या कारचं नुकसान होण्याची शक्यता असते. मात्र शिकण्यासाठी सेकंड हँड कार खरेदी करताना अनेकजण चूक करतात. ड्रायव्हिंग शिकण्यासाठी जुनी कार खरेदी करताना काही आवश्यक बाबींचा विचार करणं आवश्यक आहे. कारण छोट्याशा चुकीमुळे खूप नुकसानीचा सामना करावा लागू शकतो.
2 / 6
जर ड्रायव्हिंग शिकण्यासाठी जुनी कार खरेदी करत असाल तर त्याचा आकार खूप महत्त्वाचा ठरतो. कार आकाराने लहान असली पाहिजे. ज्यामुळे ट्रॅफिकमध्ये चालवण्यास आणि पार्क करण्यात अडचण येत नाही.
3 / 6
गाडी अधिक पॉवरफुल इंजिनची नसावी. नव्या ड्रायव्हर्ससाठी कार कंट्रोल करणे कठीण जाते. गाडी अधिक पॉवरफूल असल्यास अपघाताचीही शक्यता असते.
4 / 6
कार चालवणे शिकण्यासाठी आणि सराव करण्यासाठी अधिक महागडी कार खरेदी करू नये. किफायतशीर किमतीची कार खरेदी करावी. त्यामुळे शिकताना कुठलाही अपघात झाल्यास फार नुकसान होणार नाही. मात्र कारची कंडिशन खराब नसावी.
5 / 6
कार अधिक फिचर लोडेड नसावी. नव्या ड्रायव्हर्सना फिचर्सची माहिती कमी असते. त्यामुळे त्यांच्यासमोर अनेक अडचणी येतात. गाडी जेवढी मॅन्युअल असेल, तेवढीच ती चालवणे सोईस्कर ठरते.
6 / 6
बाजारात अधिक दिसणाऱ्या आणि विकल्या जाणाऱ्या गाडीची खरेदी करा. ज्यामुळे त्यामध्ये काही बिघाड झाल्यास अशा कारचे पार्ट्स आणि मेकॅनिक सहजपणे उपलब्ध होईल.  
टॅग्स :carकारAutomobileवाहन