Car Care Tips: Do you get an extended warranty when buying a new car? Know the pros, cons...
नवीन कार घेताना एक्स्टेंडेड वॉरंटीही घेता? जाणून घ्या फायदा, तोटा... By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 3:26 PM1 / 6नवीन कार खरेदी करताना एनेकजण एक्स्टेंडेड वॉरंटी देखील घेतात. यामुळे भविष्यात जेव्हा कंपनीची व़ॉरंटी संपते तेव्हा जर काही नादुरुस्ती आली तर खिशातले जास्त पैसे जात नाहीत. परंतू, अनेकांना काही समस्याच येत नाही आणि त्यांचे एक्सटेंडेड वॉरंटीवरचे पैसे वाया जातात. 2 / 6कंपन्या एक्सटेंडेड वॉरंटीचे पैसे आकारून बक्कळ होतात. नाहीतर त्यांनी ती का दिली असती, असा प्रश्न तुमच्याही मनात डोकावत नाहीय का? वॉरंटी म्हणजे एखादी नादुरुस्ती आली तर तुम्ही तुमची कार कंपनीकडे नेऊन एक रुपयाही न देता दुरुस्त करून घेऊ शकता. दुरुस्त होत नसेल तर ते पार्ट तुम्हाला बदलूनही मिळतात. 3 / 6ही एक्सटेंडेड वॉरंटी कंपनीची वॉरंटी संपल्यानंतर लागू केली जाते. तुम्ही कोणत्या सीझनमध्ये कार घेताय, कोणत्या ऑफरध्ये घेताय यावर कंपन्यांची वॉरंटी कालावधी अवलंबून असतो. 4 / 6अनेकदा कंपन्यांना कार खपवायच्या असतील तेव्हा त्या तीन ते पाच वर्षांची वॉरंटी देखील देऊन टाकतात. टाटा सध्या इलेक्ट्रीक कारला सात वर्षांची वॉरंटी देत आहे. तर अन्य पार्टना कमी वॉरंटी देत आहे. असे इलेक्ट्रीक कारवर लोकांचा विश्वास बसावा आणि लोक अनिश्चिततेच्या वातावरणातून बाहेर पडावेत, यासाठी केले जात आहे. 5 / 6इतर वेळेला कंपन्या कारवर एक किंवा दोन वर्षांची वॉरंटी प्रदान करतात. यानंतर तुम्हाला एक्सटेंडेड वॉरंटी घ्यावी लागते. यासाठी पैसेही भरावे लागतात. ही वॉरंटी साधारण पाच वर्षांपर्यंत घेता येते. 6 / 6अनेकदा या वॉरंटीमध्ये कारचे इंजिनच कव्हर केलेले असते, तर काही पार्ट. जेव्हा वॉ़रंटी क्लेम करण्याचा वेळ येतो तेव्हा कंपन्या ती नाकारतात. यामुळे कार घेताना कोणत्या कोणत्या पार्टना किती काळाची वॉरंटी आहे, ते एकदा विचारून घ्या. नाहीत ते भरलेले पैसेही फुकट जाण्य़ाची शक्यता आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications