शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कार चालवण्याआधी 9 'वार्निंग साईन'चा अर्थ समजून घ्या; तुम्हाला किती माहिती आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 1:23 PM

1 / 10
कार वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. कार घेऊ इच्छिणारेही कारबद्दल वेगवेगळी माहिती सतत घेत असतात. पण, ज्या गोष्टींबद्दल माहिती असावी त्याकडे असंख्य लोक दुर्लक्ष करतात. ती म्हणजे कारच्या डिसप्ले बोर्डवर दिसणारे वार्निंग साईन, वार्निंग अलार्म. ते कोणते आणि त्याचा अर्थ काय हेच जाणून घ्या.
2 / 10
इंजिन लाईट - तुम्ही गाडी सुरू केल्यावर डॅशबोर्डवर पिवळ्या रंगाची खूण दिसते, ती इंजिनबद्दल माहिती देते. एकदा चमकल्यानंतर ते बंद झाले, तर समजायचं की, कार व्यवस्थित आहे. जर ते सुरु राहिले, तर याचा अर्थ होतो की, इंजिनमध्ये काहीतरी समस्या आहे. ओव्हर हिटिंग किंवा लो आईल प्रेशर. त्यामुळे ही लाईट बंद न होता सुरूच राहते.
3 / 10
बॅटरी अलर्ट लाईट - कारमधील इलेक्ट्रिक सिस्टीम आणि कार सुरू करण्यासाठी बॅटरी खूप महत्त्वाची असते. जर अशी लाईट डॅशबोर्ड दिसत असेल, तर त्याचा अर्थ चार्जिंग सिस्टिममध्ये समस्या आहे किंवा बॅटरी केबल खराब आहे.
4 / 10
सीट बेल्ट रिमाईंडर - जे कार चालवतात त्यांना हे साईनबद्दल माहिती असेल. पण, बऱ्याचदा क्वचित कारमध्ये बसणाऱ्यांना हे लक्षात येत नाही. ही खूण म्हणजे कार चालवताना तुम्ही सीट बेल्ट लावायचं विसरला आहात.
5 / 10
एअरबॅग वार्निंग - आता प्रत्येक कारमध्ये एअर बॅग्ज असतात. ही लाईट लागली, तर याचा अर्थ कारच्या कुठल्यातरी एका एअर बॅग्जमध्ये समस्या आहे किंवा संपूर्ण एअर बॅग सिस्टिममध्ये अडचण आहे. ते वेळीच चेक करा.
6 / 10
ब्रेक अलर्ट - अनेकदा हॅण्डब्रेक लावल्यानंतर त्याला खाली करायचं लोक विसरून जातात. ते लक्षात आणून देण्यासाठी ब्रेक अलर्ट इंडिकेटर चमकतो. ब्रेक फ्लूड लीक होत असेल तरीही हा लाईट लागतो.
7 / 10
एबीएस वार्निंग लाईट - हा लाईट अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिमबद्दल वार्निंग देतो. हा लाईट लागला तर समजून जा की, सिस्टिममध्ये काहीतरी बिघाड झाला आहे.
8 / 10
टायर प्रेशर वार्निंग - सध्या हॅचबॅक, सेडान वा एसयूव्हीच्या टॉप श्रेणीत टायर प्रेशर मोजण्यासाठी टायर प्रेशन मॉनिटरिंग सिस्टिम येत आहे. कारच्या टायरमध्ये कमी हवा असेल, तर हा लाईट लागेल.
9 / 10
ऑईल प्रेशर वार्निंग - डॅशबोर्डवर लाल रंगाचा हा लाईट चालूच राहिला, तर समजून जा की, ऑईल प्रेशर कमी आहे. अशावेळी गाडीचे बोनेट खोलून इंजिन आईल चेक करा. ऑईल सर्क्युलेशन सिस्टिम अडचण आहे का, कुठे लीक आहे का किंवा ऑईल पंपमध्ये बिघाड नाही ना, हे चेक करून घ्या.
10 / 10
इंजिन टेम्परेचर वार्निंग - कारचे इंजिन चालू असताना विशिष्ट तापमान असावं लागलं. डॅशबोर्डवर टेम्परेचर साईन सतत लागत असेल. तर याचा अर्थ इंजिन ओव्हर हीट होत आहे. कुलिंग सिस्टिममध्ये बिघाड झाल्यामुळे हे होऊ शकते.
टॅग्स :carकारAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगtechnologyतंत्रज्ञान