Car Driving Tips: Petrol, diesel prices go up; save money by increasing mileage of vehicle
Car Driving Tips: पेट्रोल, डिझेलचे दर वाढतायत; अशी घाला वाहनाच्या घटत्या मायलेजला लगाम... By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 4:10 PM1 / 10आज आपल्याकडे पेट्रोलचे दर जवळपास 98 रुपये आणि डिझेल 87 रुपयांवर गेले आहे. हळूहळू म्हणजेच पुढील आठवड्यातच पेट्रोल 100 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीदेखील इंधनाचे दर कमी होणार नाहीत, असे अप्रत्यक्षरित्या सांगितले आहे. यामुळे आता खिशावरचा भार कमी करण्य़ाची जबाबदारी आपल्यावरच येऊन ठेपली आहे.2 / 10पेट्रोलपेक्षा डिझेलमुळे खिशावर जास्त परिणाम होतो. तुम्ही वाहनमालक असा किंवा नसा. तुम्हालाही महागाईचे चटके सोसावे लागणार आहेत. अन्न धान्य, भाजीपाल्यापासून सगळी मालवाहतूक ही डिझेलच्या वाहनांतूनच होते. ते वाहतुकीचे दर वाढविणार पर्यायाने तुम्हालाही वाढत्या दराने माल खरेदी करावा लागणार आहे. 3 / 10पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीवर सरकारने आंतरराष्ट्रीय बाजाराकडे बोट दाखविले आहे. परंतू आपले कर काही कमी करण्याचे नाव घेत नाहीय. आता तुमच्याच हाती तुमच्या खिशात खुळखुळणारे पैसे वाचविण्याचे उपाय आहेत. आम्ही त्यातील काही उपाय सांगणार आहोत. 4 / 10तुम्हाला आता एसी कारमधून फिरण्याची सवय झाली असेल. हे उकाड्याच्या किंवा प्रदुषणाच्या वेळी ठीक आहे. परंतू जिथे निसर्गाची साथ आहे, तिथे खिडकीच्या काचा उघड्या ठेवल्या आणि एसी बंद करून वाहन चालविले तर दोन फायदे होणार आहेत. 5 / 10पहिला म्हणजे तुमच्या कारला कमी इंधन लागेल. दुसरा फायदा म्हणजे तुम्हाला ताजी हवा मिळेल जी तुमच्या फायद्याची ठरणार आहे. बऱ्याचदा बाहेरचा आवाज, धूळ किंवा गाणी ऐकायला त्रास होतो म्हणून तुम्ही काचबंद एसीमध्ये गाडी चालवत असाल, परंतू यामुळे तुमचा खिसा काहीसा हलका होणार आहे. 6 / 10आजकाल तंत्रज्ञान खूप अॅडव्हान्स झाले आहे. त्याचा फायदाही उठवायला हवा. तुमच्या स्मार्टफोनमध्ये मॅप असतो, त्याचा वापर करायला हवा. प्रवास करताना काही वेळ आधी एकदा मॅप पाहून रस्ता ठरवावा. समजा तुम्हाला जो रस्ता माहित आहे, अंतराने कमी देखील आहे. परंतू त्यावर जास्त ट्रॅफिक असले तर वेळही जातो आणि इंधनही जास्त लागते. 7 / 10यामुळे 5-10 किमी जास्तीचे अंतर असेल आणि ट्रॅफिक नसेल तर तुमचा वेळ जरी तेवढाच गेला तरीदेखील साऱखा क्लच, ब्रेक अॅक्सिलेटर दाबून इंजिन आणि इंधन जास्त वापरण्यापेक्षा थोडा लांबीचा रस्ता केव्हाही फायद्याचा ठरतो. 8 / 10याचबरोबर चांगला रस्ता देखील फायद्याचा ठरतो. एकाच ठिकाणी जाण्यासाठी दोन तीन रस्ते असतील. परंतू त्यामध्ये एखादा रस्ता खड्ड्यांचा किंवा सिंगल लेनचा असेल आणि वाहतुकही जास्त असेल तर तो न निवडलेला बरा. कारण इथेही तुम्ही ओव्हरटेक मारण्यासाठी सारखे गिअर बदल, सारखे ब्रेक दाबणे आदी प्रकार करत राहणार आणि तिकडे इंधन जास्त जाळत राहणार. 9 / 10पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीने त्रस्त झालाच असाल. तर तुम्हाला वाहन चालविण्याची सवय बदलावी लागणार आहे. गाडी चालविताना गिअर शिफ्टिंग आणि अॅक्सलरेशन करण्यावरही इंधनचा खप अवलंबून असतो. गाडी चालू केल्यानंतर अनेकजण लगेचच पहिल्या गिअरमध्ये फूल अॅक्सलरेशन करत वेग पकडण्याचा प्रयत्न करतात. 10 / 10इंजिन थंड असते, ऑईल खाली बसलेले असते. यामुळे तेव्हा इंजिनाला खूप ताकद लावावी लागते. तेव्हा इंजिनदेखील जास्त इंधन घेते. यामुळे योग्य मायलेज मिळण्यासाठी गाडी सुरु केल्यावर कमीतकमी 30 सेकंद सुरु ठेवावी नंतर आणखी ३० सेकंद एकाच हळू वेगात पुढे न्यावी. यानंतर तुम्हाला हवा तो वेग हळूहळू घेता येईल. यामुळे तुमचे मायलेज सामान्य राहिल. आणखी वाचा Subscribe to Notifications