शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुमची कार घटाघट पेट्रोल पिते? या टिप्स वापरा, मायलेज वाढेल, होईल पेट्रोल आणि पैशांची बचत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 6:34 PM

1 / 6
गेल्या काही वर्षांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत जर कुठल्याही व्यक्तीच्या कारने कमी मायलेज देण्यास सुरुवात केली तर तो खर्च वाढेल. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत, त्याचा अवलंब केल्यास तुमची कार चांगलं मायलेज देऊ लागेल.
2 / 6
कारचं मायलेज हे बहुतांशी ड्रायव्हिंग करण्याची पद्धत, ड्रायव्हिंग करण्याची जागा यासह इतर काही बाबींवर अवलंबून असते. त्या पुढीलप्रमाणे आहेत.
3 / 6
कार चालवताना क्लच आणि ब्रेकचा योग्य वापर करा. गाडी चालवताना क्लचवर सारखा पाय देऊ नका, त्यामुळे मायलेजमध्ये फरक पडतो. त्याशिवाय योग्य गिअरमध्ये कार ड्राइव्ह करा. लहान गिअरमध्ये अधिक आरपीएमवर ड्राइव्ह केल्यानेसुद्धा मायलेज कमी होते. जिथे गरज असेल केवळ तेव्हाच ब्रेक लावा. कारण ब्रेक लावल्यानंतर जेव्हा तुम्ही स्पीड वाढवता, तेव्हा त्या स्थितीत मायलेज कमी होते.
4 / 6
टायरमधील हवेच्या प्रेशरवर लक्ष ठेवा. कारच्या सर्व टायर्समध्ये नेहमी प्रेशर असला पाहिजे. त्यासाठी आठवड्यातून किमान एकदा टायरमधील प्रेशर चेक करा. टायरमध्ये कमी हवा असल्यास मायलेजवर परिणाम होतो. त्यासाठी वेळोवेळी एअर प्रेशर चेक करत राहा.
5 / 6
कारचं चांगलं मायलेज मिळावं यासाठी स्पीड मेंटेन ठेवा, म्हणजेच एकाच स्पीडवर कार ड्राईव्ह करा. सारखा सारखा वेग कमी करून पुन्हा वाढवल्याने मायलेज घटते. त्यासोबतच वेगाने एक्सिलरेटसुद्धा करू नका. हायवेवर चांगल्या मायलेजसाठी तुम्ही ताशी ७० ते ९० किमी वेगाने कार चालवू शकता.
6 / 6
कार चांगल्या प्रकारे मेंटेन करा, सर्व्हिसिंग वेळोवेळी करत राहा. त्यामुळे मायलेज वाढण्यामध्ये मदत मिळेल. कार नवी असो वा जुनी, वेळेवर सर्व्हिस आवश्यक आहे. किमान वर्षातून एकदा किंवा १० हजार किमी चालल्यावर कार सर्व्हिस करा.
टॅग्स :carकारAutomobileवाहनPetrolपेट्रोल