शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Car subscription plan: जबरदस्त ऑफर! 27 हजारात घरी न्या नवी कोरी कार; 4 वर्षांसाठी तुम्हीच असाल कारचे मालक...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 2:22 PM

1 / 8
Volkswagen Virtus rent: नवीन कार घेणे हे अनेकांचे स्वप्न असते. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप पैसा लागतो. बजेट नसल्यामुळे अनेकांना कार खरेदी करता येत नाही. ग्राहकांचे कमी बजेट समजून आजकाल कार कंपन्या सबस्क्रिप्शन प्लॅन ऑफर करत आहेत.
2 / 8
याद्वारे तुम्ही मासिक आधारावर कार भाड्याने घेऊ शकता. जोपर्यंत गाडी भाड्याने आहे तोपर्यंत गाडी तुमचीच असेल. मारुती सुझुकी आणि महिंद्रा व्यतिरिक्त, जर्मन ऑटोमोबाईल कंपनी फोक्सवॅगनदेखील अशी सुविधा देत आहे.
3 / 8
तुम्ही फॉक्सवॅगनची सेडान कार Volkswagen Virtus फक्त 27,000 रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकता. फॉक्सवॅगनच्या म्हणण्यानुसार, ग्राहक फक्त एक महिन्याचे सुरक्षा पैसे आणि आगाऊ भाडे देऊन नवीन व्हर्टस सेडानचे मालक होऊ शकतात.
4 / 8
ही सेडान भारतात या वर्षी जून महिन्यात 11.21 लाख रुपयांच्या सुरुवाती किमतीत लॉन्च करण्यात आली होती. सबस्क्रिप्शन योजनेअंतर्गत, सेडान ₹ 27,000 पेक्षा कमी किमतीत घरी आणली जाऊ शकते.
5 / 8
सबस्क्रिप्शन योजनेअंतर्गत फोक्सवॅगनला तुम्हाला दोन ते चार वर्षांसाठी गाडी भाड्याने देते. विशेष बाब म्हणजे या योजनेत टर्म इंश्योरंस, सर्विस आणि रिपेअर सामील आहे. म्हणजेच तुम्ही भाडे द्या आणि कार वापरा.
6 / 8
या प्लॅनद्वारे, ग्राहकांना लाखो रुपये भरुन कार घेणे किंवा कमी किमतीत रिशेअर करणे, यांसारख्या अडचणींपासून मुक्ती मिळेल. Volkswagen Vertus चे भाडे ₹26,987 पासून सुरू होते.
7 / 8
गाडीचे फीचर्स- Virtus मध्ये दोन इंजिन पर्याय दिले आहेत. यात 1-लिटर टर्बो-पेट्रोल (115PS/178Nm) आणि 1.5-लीटर टर्बो-पेट्रोल (150PS/250Nm) इंजिन आहेत. पहिले इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिकशी जोडलेले आहे. तर 1.5-लिटर इंजिन 7-स्पीड DSG (ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक) सह येते.
8 / 8
या सेडानला वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप आणि संपूर्ण डिजिटल ड्रायव्हर डिस्प्लेसह 10.1-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. याशिवाय, यात सिंगल-पॅन सनरूफ, कनेक्टेड कार टेक, वायरलेस फोन चार्जर, फ्रंट सीट्स आणि रेन सेन्सिंग वायपर देखील मिळतात.
टॅग्स :Volkswagonफोक्सवॅगनAutomobileवाहन