Car Tips: Don't buy a car-bike just by looking at the mileage; It was also a loss ...
Car Tips: फक्त मायलेज पाहून खरेदी करू नका कार-बाईक; हे नुकसानही होते... By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 3:25 PM1 / 11पेट्रोल, डिझेल महाग (Petrol, diesel price hike) झाल्याने लोक आता एकतर सीएनजी (CNG) किंवा जास्त मायलेज असलेल्या कारकडे वळू लागले आहेत. कोरोनामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा धोक्याची आणि बहुतांश बंद असल्याने लोकांना खासगी वाहने वापरावी लागत आहेत. यामुळे सेकंड हँड गाड्यांचे मार्केटही वधारले आहे. (More Mileage car became expensive to your pocket.)2 / 11बहुतांश लोक कार किंवा स्कूटर मायलेज किती जास्त देते याकडे लक्ष देतात. ग्राहक कमी खर्चात जास्त लांबचे अंतर कापणाऱ्या गाड्या पसंद करू लागले आहेत. अनेकदा लोक मायलेजच्या चक्करमध्ये डिझेल कार खरेदी करतात. 3 / 11पेट्रोलच्या तुलनेत डिझेल कार जास्त मायलेज देते हे खरे आहे. परंतू फक्त मायलेज पाहून कार खरेदी करावे का? कार खरेदी करताना मायलेज जरूर पहावे. मात्र, याशिवायही अनेक पैलू आहेत, ज्यावर जरूर लक्ष द्यावे लागणार आहे. 4 / 11काही वर्षांपूर्वीची गोष्ट वेगळी होती. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये जवळपास 15 ते 20 रुपयांचे अंतर होते. हळू हळू हे अंतर कमी होऊ लागले आणि आता हे अंतर जवळपास 12 रुपयांएवढे आहे. काही ठिकाणी 10 रुपये फरक. 5 / 11भारतात बीएस-६ नॉर्म लागू झाल्यावर मारुती सुझुकी सारख्या कंपन्या फक्त पेट्रोल कार बनवू लागल्या आहेत. डीझेल कारचे अनेक नुकसान देखील आहेत. पेट्रोलच्या तुलनेत डिझेल कार जास्त NO2 उत्सर्जन करते, जे पर्यावरणासोबत आरोग्यालाही हाणीकारक आहे.6 / 11पेट्रोलच्या तुलनेत डिझेल कारचे सर्व्हिसिंग जास्त महाग असते. जसजशी डिझेल कार जुनी होत जाईल तससशी त्याचा मेन्टेनन्स वाढत जातो. पेट्रोल इंजिनच्या तुलनेत डिझेल इंजिनचे आयुष्यही कमी असते. 7 / 11आणखी एक सर्वात महत्वाची बाब म्हणजे, डिझेल कार या पेट्रोल कारच्या तुलनेत जास्त महाग असतात. यामुळे तुमचा वापर आणि डिझेलसाठी लागणारा वरचा पैसा याचा हिशेब घालावा. 8 / 11डिझेल कार या पेट्रोल कारपेक्षा दीड ते दोन लाखांनी महाग असतात. त्या पैशात तुम्ही पेट्रोल टाकू शकता. तसेच दीड दोन लाखांचे व्याज काढा. ते किती होते, ते पहा. कर्जावर हप्ता किती बसतो ते पहा. हे नुकसान तुम्ही फायद्यात वापरू शकता. 9 / 11डिझेल कारची रिसेल व्हॅल्यू देखील कमी होते. कारण त्यांची किंमत जास्त असते. त्यामुळे रिसेल करताना पेट्रोल कारपेक्षा जास्त किंमत तुटते आणि त्याचा फटका तुम्हालाच बसतो. आधीच जास्त पैसे देऊन कार घेतलेली असते. 10 / 11डिझेल कारचा इन्शुरन्स प्रिमिअमही जास्त असतो. जर तुम्हाला जास्त लांबचा प्रवास करायचा नसेल तर पेट्रोल कार खरेदी करणे हुशारीचे राहिल. ज्यांना दररोज लांब-लांबचा प्रवास करावा लागतो आणि ज्यांच्याकडे सीएनजी उपलब्ध नाही त्यांच्यासाठी डिझेल कार उपयोगाची आहे.11 / 11तोच प्रकार बाईकच्या बाबतीत आहे. जर तुम्हाला दररोज 10-15 किमी अंतर जायचे असेल तर जास्त मायलेजवाल्या बाईकच्या मागे धावायची गरज नाही. यातून खूप जास्त बचत होणार नाहीय. हा जर तुमचा फिल्ड जॉब असेल तर तुम्हाला मायलेजची बाईक, स्कूटर घ्यावी लागेल. आणखी वाचा Subscribe to Notifications