Catch the mistake of the front in the road accident! How useful is dashcam? Find out...
रस्ते अपघातात समोरच्याची चुकी पकडा! डॅशकॅम किती कामाचा? जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 12:18 PM1 / 6कारमध्ये डॅश कॅम लावण्याची प्रथा भारतात अजूनतरी रुजलेली नाहीय. अमेरिकेत डॅश कॅम लावणे बंधनकारक आहे. यामुळे अनेकदा तुम्ही सोशल मिडीयावर पाहिले असेल, चित्र विचित्र अपघाताचे व्हिडीओ पोस्ट केले जातात. ते काही कार चालविताना कोणी हातात कॅमेरा घेऊन नाही बसत, तर डॅश कॅम या छोट्याशा कॅमेराद्वारे ते कैद झालेले असतात. 2 / 6डॅश कॅम हा सध्याच्या काळात एक सेफ्टी फिचर म्हणून वापरला जात आहे. ह्युंदाईने भारतात याची सुरुवात केली आहे. ह्युंदाई एक्सटरमध्ये हे फिचर देण्य़ात आले आहे. तुम्ही बाहेरील मार्केटमधून देखील हे कॅमेरे बसवू शकता. काहीजण पुढे आणि मागे देखील हे कॅमेरे लावतात. 3 / 6काही डॅशकॅममध्ये जीपीएस देखील इनबिल्ट असते. यामुळे तुम्हाला तुमची कार चोरीला गेली, किंवा दुसरा कोणी परिचित घेऊन गेला असेल तर तो कुठे आहे, हे देखील समजू शकते. 4 / 6वाहन चालविताना हा छोटा कॅमेरा लावला तर रस्त्यावरील ब्लॅकमेलिंग, रोड रॅश ड्रायव्हरपासून वाचता येणार आहे. डॅशबोर्डवरील विंडशिल्डवर हा कॅमेरा लावता येतो. काही डॅश कॅमेरे रात्रीच्या वेळी देखील समोरच्या वाहनाची नंबर प्लेट रेकॉर्ड करतात. 5 / 6रस्त्यावरून वाहन चालविणे हे धोकादायक आहे. पार्किंग करताना, वळविताना वाहन दुसऱ्या वाहनाला आदळते. अनेकदा तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यातील असाल, पासिंग तिथले नसेल तर समोरचा व्यक्ती त्याची चुकी असली तरी दादागिरी करतो. परंतू, डॅशकॅम असेल तर तुम्ही पोलिसांना बोलावून त्याची हेकडी उतरवू शकता. 6 / 6अनेकदा अपघातानंतर पैसे उकळले जातात. लोक त्याचीच वाट पाहतात. अनेकदा असे प्रसंग घडविले देखील जातात. तुमच्याकडील डॅशकॅममध्ये ते सर्व रेकॉर्ड होऊ शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications