शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मस्तच...जमिनीवरच नाही तर, पाण्यावरही सुस्साट धावणारी सायकल आली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 5:11 PM

1 / 10
गेल्या काही वर्षांपासून आपण पाण्यावर चालणारी कार किंवा मोटारसायकलबाबत वाचले आहे. मात्र, तंत्रज्ञान आता एवढे पुढे गेले आहे की, ह्युंदाईने काही वर्षे मेहनत घेत उडणारी कार बनविली आहे. उबरसोबत ही उडणारी कार चालविली जाणार आहे.
2 / 10
कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये CES 2020 न्यूझीलंडच्या एका कंपनीने पाण्यावर चालणारी सायकल आणली आहे. या कंपनीचे नाव आहे मंता5. ही एक इलेक्ट्रीक हायड्रोफॉईल सायकल आहे.
3 / 10
कंपनीने हायड्रॉफॉयलर XE-1 हे नाव दिले आहे. यामध्ये अमेरिकेच्या कप सेलबोटमध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान देण्यात आले आहे.
4 / 10
XE-1 ला कंपनीने विमानासाठी वापरली जाणारी TIG वेल्डींग 6061-T6 अॅल्यूमिनिअम फ्रेम दिली आहे. याशिवाय कंपनीने यामध्ये एक हायब्रिड ड्राईव्हट्रेनही दिलेली आहे.
5 / 10
या सायकलला पाण्यात चालविताना पॅड़ल मारावे लागतात. यामध्ये कंपनीने लिथिय़म बॅटरीचा वापर केला आहे. तसेच 460W-ई-बाइक मोटरचा वापरही करण्यात आला आहे.
6 / 10
यामुळे पाण्यावर ही सायकल 21 किमी प्रती तासाच्या वेगाने पळणार आहे.
7 / 10
कंपनीने या सायकलला एक काढता येणारी बॅटरीही दिली आहे. ही बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 तास लागतात. एका चार्जिंगमध्ये ही बॅटरी 60 मिनिटे चालू शकते.
8 / 10
Manta5 च्या दाव्यानुसार या हायब्रिड ड्राईव्हट्रेन सायकलमध्ये इंडस्ट्रीच्या स्टँडर्ड सुट्या भागांचा वापर करण्यात आला आहे. यामुळे हे सुटे पार्ट बाजारात मिळणार आहेत.
9 / 10
या अनोख्या Hydrofoiler XE-1 ची किंमत 7490 डॉलर म्हणजेच 5.38 लाख रुपये एवढी आहे.
10 / 10
ही किंमत जरी महागडी वाटत असली तरीही अनेकांचे लक्ष वेधून घेणारी ही सायकल आहे.
टॅग्स :Waterपाणी