शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Cheap Tesla Car: लवकरच भारतात स्वस्त Tesla कार येणार, Elon Musk यांची मोठी घोषणा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 7:37 PM

1 / 7
Elon musk G20 Summit 2022: गेल्या काही महिन्यांपासून भारतात इलेक्ट्रिक कार्सची मागणी आणि विक्री झपाट्याने वाढत आहे. सर्वच कंपन्यात आता आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणत आहेत. यातच आता जगातील आघाडीची इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्ला(Tesla) भारतात येण्यास उत्सुक आहे.
2 / 7
टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार्स खूप महाग आहेत, तसेच भारतातील आयात शुल्कामुळे त्यांच्या किमती गगनाला भिडतील. अशा परिस्थितीत स्वस्त टेस्ला कारची वाट पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon musk) यांनी मोठी घोषणा केली आहे.
3 / 7
टेस्ला लवकरच भारतीयांसाठी परवडणारी टेस्ला कार बनवण्याच्या तयारीत आहे. इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या G20 शिखर परिषदेला संबोधित करताना टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या या घोषणेने लवकरच भारतीयांचे टेस्ला कार घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
4 / 7
यावेळी बोलताना इलॉन मस्क म्हणाले की, टभारत आणि इंडोनेशियासारख्या बाजारपेठांसाठी स्वस्त टेस्ला मॉडेल तयार केले जाऊ शकते. आम्हाला वाटते की, येथील नागरिकांसाठी कमी किमतीची आणि परवडणारी कार बनवणे, हा एक चांगला पर्याय असेल. असे काहीतरी केले पाहिजे.'
5 / 7
इलॉन मस्क हे भारत सरकारला टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारवर कर सवलत देण्याची विनंती बऱ्याच दिवसांपासून करत आहेत. कंपनीने सरकारशी चर्चा करण्यासाठी आपली एक उपकंपनीही बंगळुरूमध्ये उघडली आहे. मात्र, भारत सरकारने यासाठी स्पष्ट नकार दिला आहे. याचे कारण म्हणजे, टेस्लाची कार बनवणारी फॅक्टरी चीनमध्ये आहे.
6 / 7
भारत सरकारने मस्क यांना सांगितले आहे की, ते भारतात कारखाना सुरू करणार असतील, तरच कर सवलत दिली जाऊ शकते. दरम्यान, भारतात जबरदस्त आयात शुल्क लादले जाते- सध्या भारत $40 पेक्षा जास्त किंमत असलेल्या आयात कारवर 100 टक्के कर लावतो.
7 / 7
यापेक्षा कमी किमतीच्या वाहनांवर 60% कर आकारला जातो. पूर्व-मालकीच्या आयात केलेल्या कारसाठी, कर 125% आहे. यामुळे भारतात इतर देशातील गाडी चालवण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. टेस्ला आणि इलॉनम मस्क काय निर्णय घेणार, हे येणाऱ्या काळात कळेलच.
टॅग्स :Teslaटेस्लाelon muskएलन रीव्ह मस्कAutomobileवाहन