शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Cheapest CNG Cars: ६ लाखांपेक्षाही कमी किंमतीच्या CNG कार्स; जबरदस्त मायलेज, पेट्रोलचं टेन्शनही नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 9:49 PM

1 / 9
गेल्या काही महिन्यांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमतीनं उच्चांक गाठला आहे. अशा परिस्थितीत काही जणांनी पेट्रोल डिझेलच्या कार्स घेण्याऐवजी अन्य दिशेने आपला मोर्चा वळवला आहे. काही जणांचा कल हा इलेक्ट्रीक कार्सकडे आहे. परंतु इलेक्ट्रीक कारची किंमत तुलनेनं जास्त असल्यानं ती सर्वांनाच परवडेल अशीही नाही.
2 / 9
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) वाढ झाल्याने सीएनजी (CNG) वाहनांची मागणी झपाट्याने वाढली आहे. सध्या तर अनेक सीएनजी गाड्यांसाठी महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागतेय. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही खिशाला परवडणारं सीएनजी वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
3 / 9
येथे आम्ही तुम्हाला देशातील सर्वात स्वस्त 3 सीएनजी कार्सबद्दल (Cheapest CNG Cars) सांगत आहोत, ज्यांची किंमत 6 लाख रुपयांपेक्षा (CNG Cars Under 6 Lakh) कमी आहे. विशेष बाब म्हणजे तिन्ही कार्स या मारुती सुझुकीच्या (Maruti Suzuki) आहेत.
4 / 9
परवडणारी CNG कार असण्यासोबतच, मारुती Eeco ही 7 सीटर कार आहे. परंतु या कारचे केवळ 5 सीटर मॉडेल सीएनजीसह उपलब्ध आहे. याची किंमत 5.88 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. यात 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलेय.
5 / 9
हे इंजिन 6000 rpm वर 62bhp आणि 3000 rpm वर 85Nm पीक टॉर्क जनरेट करते. मारुती Eeco CNG ची ARAI सर्टिफाईड फ्युअल इकॉनॉमी 20.88 km/kg इतकी आहे.
6 / 9
मारुती S-Presso ही कार 4 CNG व्हेरिअंटमध्ये येते. यामध्ये LXi, LXi(O), VXi आणि VXi(O) या व्हेरिअंटचा समावेश आहे. या कारची किंमत 5.24 लाख ते 5.56 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी आहे.
7 / 9
यात 1.0 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आलेय. ते 59PS आणि 78Nm पीक टॉर्क जनरेट करते. मारुती S-Presso CNG ची ARAI सर्टिफाईड फ्युअल इकॉनॉमी 31.2 km/kg आहे.
8 / 9
मारुती अल्टो 800 ही देशातील सर्वात स्वस्त सीएनजी कार आहे. ही कार दोन व्हेरिअंटमध्ये येते. यामध्ये LXI आणि LXI(O) यांचा समावेश आहे. या कारच्या LXI मॉडेलची किंमत 4.89 लाख रुपये आहे आणि LXI(O) व्हेरिएंटची किंमत 4.95 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
9 / 9
कारमध्ये 0.8 लीटर 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे CNG सह 41PS आणि 60Nm पीक टॉर्क जनरेट करते. त्याचं ARAI सर्टिफाईड फ्युअल इकॉनॉमी 31.59 किमी/किलो आहे.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीIndiaभारत