cheapest electric scooter with best driving range no need of driving licence and registration
'या' Electric Scooters साठी Driving Licence ची आवश्यकता नाही; सुरूवातीची किंमत ४० हजार रूपये By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 1:20 PM1 / 10अनेकदा आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यामुळे गाडी चालवणं अनेकांना शक्य होत नाही. परंतु आता त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. देशात अशी अनेक वाहने आहेत, ज्यांच्यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सची (DL) गरज नाही. सध्या देशात इलेक्ट्रीक स्कूटरची मागणी झपाट्याने वाढली आहे आणि या विभागात एकापेक्षा जास्त पर्याय उपलब्ध आहेत.2 / 10आज आम्ही तुम्हाला त्या किफायतशीर इलेक्ट्रीक स्कूटरबद्दल सांगणार आहोत ज्यांची किंमत कमी नाही तर उत्तम ड्रायव्हिंग रेंज देखील प्रदान करतात. या इलेक्ट्रीक स्कूटरची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती चालवण्यासाठी तुम्हाला ना ड्रायव्हिंग लायसन्सची गरज आहे ना वाहन नोंदणीची, त्यामुळे या इलेक्ट्रीक स्कूटर बद्दल जाणून घेऊया.3 / 10 Hero Electric Flash LX: हिरो इलेक्ट्रीक ही देशातील आघाडीची इलेक्ट्रीक वाहन उत्पादक कंपनी आहे. दरम्यान, या कंपनीचा हिरो मोटोकॉर्पशी काहीही संबंध नाही. कंपनीचा Flash LX तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. 4 / 10यामध्ये कंपनीने 250W क्षमतेची इलेक्ट्रीक मोटर आणि 51.2V / 30Ah क्षमतेची बॅटरी पॅकचा वापर करण्यात आली आहे. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, या स्कूटरसाठी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा नोंदणीची आवश्यकता नाही. याचा टॉप स्पीड 25 किमी/तास आणि ड्रायव्हिंग रेंज 85 किमी आहे. ही स्कूटर पूर्ण चार्ज होण्यासाठी 4 ते 5 तास लागतात. याची किंमत 56,940 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतरकी आहे. 5 / 10Lohia Oma Star Li लोहिया मोटर्सची ओमा स्टार ली आमच्या सूचीतील पुढील स्कूटर आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड 25 किमी प्रति तास असल्याने, यासाठी परवाना आणि नोंदणी सारख्या कागदपत्रांची गरज नाही. यात 250W इलेक्ट्रिक मोटर आणि 30Ah बॅटरी पॅक देण्यात आला आहे. 6 / 10कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर जास्तीत जास्त 100 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते आणि पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 3 तास लागतात. यात ड्रम ब्रेक्ससह हायड्रोलिक टेलिस्कोपिक सस्पेंशन देण्यात आलं आहे. या स्कूटरची किंमत 51,750 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी निश्चित करण्यात आली आहे. 7 / 10Ampere Reo Elite: अॅम्पीयर व्हेईकल्स हा मुळात ग्रीव्हजचा ब्रँड आहे आणि कंपनी दीर्घकाळापासून देशांतर्गत बाजारात इलेक्ट्रीक वाहनांची यशस्वी विक्री करत आहे. कंपनीने अलीकडेच Rio Elite लाँच केलr. यात 48V-27Ah क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आले आहे. 8 / 1025 kmph च्या टॉप स्पीडसह, ही स्कूटर एका चार्जमध्ये 60 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. त्याची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 8 ते 10 तास लागतात. ही स्कूटर एकूण 4 रंगांमध्ये येते, ज्यात ग्लॉसी ब्लॅक, ग्लॉसी व्हाइट, ग्लॉसी रेड, ग्लॉसी ब्लूचा समावेश आहे. कंपनी त्याच्या बॅटरीवर 1 वर्षाची वॉरंटी देते. या स्कूटरची किंमत 43,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी आहे. 9 / 10Detel Easy Plus: आमच्या यादीतील ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक स्कूटर आहे. डिटेलने अलीकडेच सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक मोपेड, Easy Plus लाँच केली. ग्राहकांना हे इलेक्ट्रीक मोपेड कंपनीच्या अधिकृत वेबसाईटद्वारे फक्त 1,999 रुपयांमध्ये (टोकन रक्कम) बुक करू शकतात. कंपनीचा दावा आहे की या इलेक्ट्रीक मोपेडमध्ये 170 एमएमचे सर्वोत्तम ग्राउंड क्लिअरन्स आहे. 10 / 10यामध्ये 48V आणि 20Ah क्षमतेचा बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. या स्कूटरमध्ये बॅटरी सीटखाली बसवण्यात आली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, हे वाहन एका चार्जमध्ये 60 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. या स्कूटरची किंमत 39,999 रुपये (बिना जीएसटी) आहे. यामध्ये देण्यात आलेल्या सर्व स्कूटर्सच्या किंमती अधिकृत वेबसाईटवरून घेण्यात आलेल्या आहे. याशिवाय ड्रायव्हिंग रेंज स्कूटर चालवण्याच्या पद्धतीवर आणि अन्य बाबींवर अवलंबून आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications