चीनच्या कंपनीने मारुतीच्या फ्राँक्सची कॉपी केली; 1200 किमी रेंजवाली एसयुव्ही लाँच केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 15:26 IST
1 / 9चीनच्या कंपनीने सगळ्या कार कंपन्यांवर कडी केली आहे. थोडी थोडकी नव्हे तर १२०० किमीची रेंज असलेली ती पण भलीमोठी एसयुव्ही लाँच केली आहे. चिनी कंपनी GAC ने ही Hyptec HL नावाची ईलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच केली आहे. 2 / 9हायप्टेक एचएल ही एसयुव्ही एक्सटेंडेड रेंज आणि ईव्ही अशा दोन प्रकारात येते. एक्सटेंडेड म्हणजे स्मार्ट हायब्रिड सारखीच टेकनॉलॉजी वापरण्यात आली आहे. या कारची किंमत ३१ लाख रुपयांपासून सुरु होते. 3 / 9कंपनीने एका यॉटच्या डिझाइनपासून प्रेरित होऊन हायपटेक एचएल डिझाइन केले आहे. हेडलाइट्स क्रिस्टल लॅम्प बीड्सपासून बनवताना मध्यभागी ग्रिल वेगवेगळ्या लाईट युनिट्सने जडलेले आहे जे वेगवेगळे लाईटिंग पॅटर्न तयार करू शकतात. ही कार ४ रंगात उपलब्ध आहे.4 / 9ही एसयुव्ही रूफ लिडर, तीन मिलिमीटर-वेव्ह रडार, ११ कॅमेरे आणि १२ अल्ट्रासोनिक रडारने सुसज्ज आहे. हे सेन्सर्स वाहन जास्त रहदारीतून बाहेर काढायचे असते किंवा पार्क करायचे असते तेव्हा उपयुक्त ठरतात. तसेच ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टीमना हाय-डेफिनिशन नकाशांवर अवलंबून राहत नाहीत. 5 / 9यामध्ये फास्ट चार्जिंगसाठी 800V फास्ट-चार्जिंग सिस्टम देण्यात आली आहे. यामुळे बॅटरी 15 मिनिटांत 30% ते 80% पर्यंत चार्ज होते. दोन व्हेरिअंट 3C चार्जिंग आणि वरचा व्हेरिअंट ५सी चार्जिंगला सपोर्ट करतो. या कारची बॅटरी फक्त 10 मिनिटांत 80% पर्यंत चार्ज होते. 6 / 9रियर व्हील ड्राइव्ह प्रकारची कार ३३५ एचपी पॉवर आणि ४३० एनएम टॉर्क जनरेट करतो. ६.५ सेकंदात ० ते १०० किमी/ताशी वेग गाठू शकते. तर ऑल-व्हील ड्राइव्ह प्रकारात फ्रंट मोटर आहे जी १७४ एचपी पॉवर आणि २४० एनएम टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की ही कार फक्त ४.५ सेकंदात ० ते १०० किमी/ताशी वेग घेऊ शकते.7 / 9या एसयुव्हीमध्ये कंपनीने ९५.९ kWh आणि १०८.३५ kWh टर्नरी लिथियम बॅटरी पॅक दिले आहेत. ६७० किमी, ७०० किमी आणि ७५० किमी अशा तीन CLTC ड्रायव्हिंग रेंज देण्यात आल्या आहेत. 8 / 9तर एक्सटेंडेड रेंज इलेक्ट्रिक व्हेईकलमधील बॅटरी ३५० किमीची रेंज देते, पेट्रोल इंजिनसाठी 53 लीटरची टाकी आहे, हे दोन्ही एकत्र मिळून १२०० किमीची रेंज देतात. यामध्ये 60.33 kWh ची बॅटरी वापरण्यात आली आहे. 9 / 9हायपटेकनुसार या कारच्या दुसऱ्या रोमध्ये दुहेरी शून्य-गुरुत्वाकर्षण असलेल्या सीट देण्यात आल्या आहेत. ही सीट 12-वे इलेक्ट्रिक एडजस्टमेंट, 18-पॉइंट हॉट स्टोन मसाज आदी गोष्टींना सपोर्ट करते.