By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 13:21 IST
1 / 8फ्रान्सची कार निर्माता कंपनी Citroen (सिट्रॉएन) ने भारतीय बाजारात दुसरी कार उतरविली आहे. ऑल-न्यू 2022 Citroen C3 क्रॉसओवर एसयूव्ही आज लाँच केली. ही कार टाटा पंचला कडवी टक्कर देणार आहे. याकारची किंमत 5.70 लाख रुपयांपासून सुरु होत आहे. 2 / 8सिट्रॉएन सी 3 कार दोन ट्रिम लेव्हल, १० एक्सटीरिअर पेंट स्कीम आणइ ५६ प्रकारची कस्टमाझेशनमध्ये मिळणार आहे. Citroen C3 ही सब कॉम्पॅक्ट एसयुव्ही आहे. परंतू कंपनी या कारची प्रसिद्धी ट्विस्टसोबतची हॅचबॅक अशी करत आहे. 3 / 8या कारमध्ये दोन इंजिनांचे पर्याय देण्यात आले आहेत. १.२ एल प्योरटेक ११० आणि १.२ एल प्योरटेक ८२. ही कार 5.70 लाख ते 8.05 लाख या प्राईज रेंजमध्ये उपलब्ध आहे. २ वर्ष किंवा ४०,००० किमी आणि २४/७ रोडसाइड असिस्टेंससाठी वाहनची वॉरंटी देण्यात येत आहे. 4 / 8ही कार तामिळनाडू येथील तिरुवल्लूर येथील प्रकल्पामध्ये तयार करण्यात आली आहे. ९० टक्क्यांपेक्षा जास्त स्पेअर पार्ट हे भारतातच बनविण्यात आलेले आहेत. कारची लांबी 3,981mm, रुंदी 1,733mm आणि उंची 1,586mm आहे. 15-इंचाची स्टील व्हील देण्यात आली आहेत, 5-इंच ड्युअल टोन अलॉय व्हील पर्याय म्हणून उपलब्ध करण्यात येणार आहेत. 5 / 8 10-इंचाची टचस्क्रीन अँड्रॉईड आणि एपल कारप्ले सपोर्च असलेली सिस्टिम देण्यात आली आहे. चार-स्पीकर साउंड सिस्टिम, फ्रंट आणि रियर USB चार्जिंग पोर्ट देण्यात आले आहेत. 6 / 8Citroen C3 मध्ये अॅटोमॅटीक गिअरबॉक्स देण्यात आलेला नाही. यामध्ये ५ स्पीड आणि ६ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. 7 / 8टर्बो पेट्रोल इंजिन 110hp ताकद आणि 190Nm चा टॉर्क देते. तर नॅचरल अॅस्पिरेटेड इंजिन 82hp ताकद आणि 115Nm चा टॉर्क देते. यामुळे नॅचरल अस्पिरेटेड इंजिन जास्त मायलेज देऊ शकते. कंपनीने कारच्या मायलेजबाबत माहिती दिलेली नाही. ही कार फक्त पेट्रोल इंजिनमध्येच मिळणार आहे. 8 / 8सुरक्षेसाठी या कारमध्ये ड्युअल एअरबॅग, रिअर पार्किंग सेन्सर आणि सीटबेल्ट रिमाईंडर देण्यात आला आहे.