शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TATA अन् Hyundai ची डोकेदुखी वाढणार! येतेय जबरदस्त कॉम्पॅक्ट SUV, आकर्षक लूक्स अन् भारी फिचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 4:27 PM

1 / 8
फ्रेंच कार निर्माता कंपनी Citroen लवकरच भारतात आपली दुसरी कार लॉन्च करणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सादर करण्यात आलेली, C3 SUV ची भारतीय रस्त्यांवर गेल्या काही काळापासून चाचणी सुरू आहे. ताज्या लूकमध्ये, कार कोणत्याही स्टिकर्सशिवाय दिसत आहे आणि ती उत्पादनासाठी सज्ज दिसते.
2 / 8
भारतीय बाजारपेठेत टाटा पंच आणि मारुती सुझुकी इग्निस सारख्या अनेक कारशी Citroen ची नवी कार टक्कर देईल असा अंदाज आहे. Citroen India च्या कार भारतीय बाजारपेठेतील स्पर्धेनुसार खूप महाग आहेत, विक्री वाढवण्यासाठी कंपनी स्वस्त दरात नवीन कार लॉन्च करू शकते.
3 / 8
Citroen C3 ही SUV कोणत्याही स्टिकर्सशिवाय हॅचबॅकच्या आकारात दिसून आली आहे. बाहेरील भाग जवळजवळ क्रॉस हॅचसारखा असून चारही बाजूंना ब्लॅक प्लास्टिक क्लॅडिंग देण्यात आली आहे.
4 / 8
कारचा लूक पाहता ही टाटा पंच सारख्या मायक्रो SUV सारखी दिसते. कारला जबरदस्त बोनट देण्यात आला आहे. ज्यावर Citroen चा लोगो आहे. तसंच यात LED हेडलॅम्प्स देखील दिसून येत आहेत.
5 / 8
एसयूव्हीच्या मागील बाजूस रॅपराउंड टेललाइट्स आणि बंपर ब्लॅक प्लास्टिक फिनिशिंगनं देण्यात आला आहे. Citroen C3 ही कॉमन मॉड्युलर प्लॅटफॉर्मवर तयार केली जात आहे ज्याचा व्हीलबेस 2,540 mm आहे. मागील सीटवर बसलेल्या प्रवाशांनाही भरपूर जागा मिळेल, असा कंपनीचा दावा आहे.
6 / 8
कारचा ग्राउंड क्लीयरन्स 180 मिमी आहे, जो टाटा पंच पेक्षा थोडा कमी आहे. कारच्या केबिनमध्ये Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटीसह 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. कारमझ्ये 1-लिटर ग्लोव्हबॉक्स आणि 315-लिटर बूटस्पेस देण्यात आली आहे.
7 / 8
कारला 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे जे 130 bhp पावर जनरेट करते आणि कंपनी हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध करुन देण्याची शक्यता आहे.
8 / 8
नवीन C3 कारची टाटा पंच आणि इग्निस सारख्या कारशी स्पर्धा असणार आहे, परंतु किमतीच्या बाबतीत C3 कार अधिक महाग असेल. कंपनी तिचे उत्पादन देशांतर्गत करत आहे, परंतु असे असूनही ही कार महाग असण्याची शक्यता आहे.
टॅग्स :Automobile Industryवाहन उद्योगcarकारTataटाटाAutomobileवाहन