शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रस्त्यावर लवकरच धावणार CNG इनोव्हा कार; जाणून घ्या किंमत अन् लाँचिंगची तारीख

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 3:35 PM

1 / 10
भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्व वाहन कंपन्या सीएनजी वाहनांची निर्मिती करण्यावर जास्त भर देत आहेत.
2 / 10
विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून रॉयल गाडी बनवण्याची ख्याती असलेली जपानची टोयोटा कंपनीही लवकरच सीएनजी गाड्यांच्या निर्मिती करणार आहे. भारतात टोयोटाने सीएनजी व्हेरिएंटसह आपली सर्वात लोकप्रिय इनोव्हा गाडी बाजारात आणण्याची तयारी दर्शविली आहे.
3 / 10
टोयोटाची इनोव्हा क्रिस्टा सध्या भारतात पेट्रोल आणि डिझेल प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. लवकरच कंपनी सीएनजी व्हेरिएंटसह इनोव्हा क्रिस्टाचं नवं मॉडेल बाजारात आणणार आहे.
4 / 10
याबाबत कंपनीने चाचणीही सुरू केली आहे. टोयोटाने लॉन्चची तारीख अद्याप निश्चित केलेली नाही. परंतु कंपनी सातत्यानं इनोव्हा गाडीच्या सीएनजी व्हर्जनची चाचणी घेत आहे. सीएनजीवर आधारित इनोव्हा या वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत भारतीय बाजारात दाखल होऊ शकेल, असाही अंदाज वर्तवला जात आहे.
5 / 10
. वास्तविक, इनोव्हाची भारतीय बाजारपेठेत चांगली पकड आहे, अधिक जागा आणि आरामदायक प्रवासासाठी इनोव्हा एक उत्तम कार आहे. सप्टेंबरदरम्यान सीएनजी इनोव्हा क्रिस्टा भारतीय बाजारपेठेत उतरू शकते.
6 / 10
जर आपण किमतीबद्दल बोललो तर सीएनजी इनोव्हा बाजारात येणार्‍या इनोव्हापेक्षा थोडी महाग असू शकते. पेट्रोल व्हेरिएंट इनोव्हा क्रिस्टाची किंमत सुमारे 15.36 लाख रुपये असून, डिझेल मॉडेलची किंमत 16.14 लाख रुपयांपासून सुरू आहे.
7 / 10
सीएनजी इनोव्हाची किंमत ही इनोव्हाच्या डिझेल मॉडेलपेक्षा 80 हजार ते 1 लाख रुपयांनी अधिक असू शकते. विशेष म्हणजे टोयोटाने यावर्षी मार्चमध्ये इनोव्हा क्रिस्टाची खास आवृत्ती बाजारात आणली.
8 / 10
नवीन इनोव्हाच्या लूकमध्ये आणि वैशिष्ट्यांमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. नव्या इनोव्हाच्या बाह्य आणि आतील भागात इंटेरिअर अद्ययावत करण्यात आलं आहे.
9 / 10
स्पेशल एडिशन इनोव्हा बाजारात फक्त डिझेल इंजिनसह आणण्यात आली आहे. या विशेष इनोव्हा कारमध्ये 17 इंचाच्या नवीन ब्लॅक अ‍ॅलोय व्हील्स, रीअर स्पॉयलर आणि साइड स्कर्ट देण्यात आले आहेत.
10 / 10
एमपीव्हीमध्ये 360 डिग्री कॅमेरा, ऑटो फोल्डिंग ओआरव्हीएम, पॅडल लॅम्प, कीलेस एन्ट्री, पुश-स्टार्ट बटण आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
टॅग्स :Toyotaटोयोटा