शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Smart Driving License: जुने पुस्तक स्मार्ट ड्रायव्हिंग लायसनमध्ये कन्व्हर्ट करा; 200 रुपये खर्च, सोपी प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2021 10:19 AM

1 / 8
Smart Driving License: जर तुमच्याकडे जुने पुस्तकासारखे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर तुम्ही ते ड्रायव्हिंग लायसन (DL) स्मार्ट डीएलमध्ये कन्व्हर्ट करू शकता. ते कसे करावे याचा सोपा पर्याय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ट्रॅडिशनल ड्रायव्हिंग लायसनचे अॅडव्हान्स व्हर्जन हे स्मार्ट लायसन आहे. यामध्ये मायक्रोचिप असते. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक माहिती साठविलेली आहे.
2 / 8
याशिवाय Smart Driving License मध्ये लायसन धारकाचा बायोमेट्रीक डेटा, बोटांचे ठसे, रक्त गट, रेटिना आदीची माहिती साठविली जाते. हे लायसन काढताना कॉम्प्युटरवर हा डेटा घेतला जातो.
3 / 8
स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन हे टिकाऊ, ठेवण्यास सोपे असते. यामुळे फाटणे किंवा भिजण्याचे टेन्शन नसते. जर तुम्हाला तुमचे जुने लायसन बदलायचे असेल तर तुम्हाला तुमच्या आरटीओ कार्यालयात, आरटीओ वेबसाईटवर जावे लागणार आहे.
4 / 8
यावर तुम्हाला आवश्यक कागदपत्रांसोबत अर्ज जमा करावा लागणार आहे. शुल्क भरल्यानंतर तसेच तुमचे बायोमेट्रिक जमा केल्यावर तुम्हाला स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन जारी केले जाईल.
5 / 8
अप्लाय करण्यासाठी तुम्हाला राज्य परिवाहन विभागाच्या वेबसाईटवर जावे लागणार आहे. यानंतर डीएल अर्ज डाऊनलोड करावा. फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स जोडावी.
6 / 8
आरटीओमध्ये जाऊन हा अर्ज सबमिट करावा. शुल्क भरून ड्रायव्हिंग टेस्ट शेड्यूल करावी. एकदा का तुमची ड्रायव्हिंग टेस्ट क्लिअर झाली की तुमचे बायोमेट्रिक घेतले जातील. हे झाल्यावर तुम्हाला महिनाभराच्या आत स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन तुमच्या पत्त्यावर पाठविले जाईल.
7 / 8
स्मार्ट ड्रायव्हिंग लायसनसाठी अर्ज करताना तुम्हाला 200 रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. एजंट असेल तर जास्त. आरटीओ कार्यालयात गेल्यावर बाहेर अर्ज कसा करावा याची माहिती दिलेली असते. तुम्ही एजंटशिवाय स्वत: अर्ज करू शकता.
8 / 8
स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन हे तुमच्या वयाच्या 50 व्या वर्षी किंवा लायसन दिल्याच्या 20 वर्षांनी एक्स्पायर होते. यानंतर पुन्हा तुम्हाला लायसन काढावे लागते.
टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस