Dash cam is the need of the hour! How to install? Signals protect against fake accidents in car
डॅश कॅम काळाची गरज! कसा इन्स्टॉल कराल? सिग्नल, फेक अपघातांपासून वाचवतो By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 11:22 AM1 / 8सध्या परदेशात अपघातावेळी कोणाची चुकी, कोण बरोबर हे ठरविण्यासाठी किंवा अनेक गोष्टी कॅप्चर करण्यासाठी डॅशकॅम कंपल्सरी करण्यात आला आहे. याचा फायदा भारतातही अनेकांना होत आहे आणि त्याची जागृतीही अनेक कार चालकांमध्ये होत आहे. प्रवासातील सुरक्षा हा याचा मुख्य उद्देश आहे. मग हा डॅशकॅम गाडीत कसा लावावा, याबद्दल आम्ही तुम्हाला थोडे मार्गदर्शन करणार आहोत. 2 / 8जर तुमच्या कारमध्ये डॅशकॅमचे फिचर नाहीय तर तो तुम्हाला बाजारातून विकत घ्यावा लागणार आहे. दोन तीन हजारापासून १० हजारापर्यंत वेगवेगळ्या कंपन्यांचे डॅशकॅम उपलब्ध आहेत. 3 / 8यासाठी योग्य डॅश कॅम निवडण्याची आवश्यकता आहे. तुमची गरज आणि बजेटनुसार तो घ्यावा. रिझोल्यूशन, नाईट व्हिजन आणि पार्किंग मोड यांसारखी वैशिष्ट्ये लक्षात घ्यावीत. 4 / 8आता हा डॅशकॅम बसविण्यासाठी तुम्हाला स्क्रू ड्रायव्हर, केबल क्लिप, ट्रिम काढण्याचे साधन आणि पॉवर अॅडॉप्टर (डॅश कॅमसह समाविष्ट) आवश्यक असेल.5 / 8डॅश कॅम लावण्यासाठी योग्य जागा निवडा. तुमची उंची पाहून ही जागा असावी. कारण तुमच्या दृष्टीच्या आड आला तर त्याचा त्रास होऊ शकतो. अनेकजण रिअर व्हू आरशाजवळ हा डॅशकॅम लावतात. 6 / 8जिथे हा डॅशकॅम चिकटवायचा आहे तिथली जागा व्यवस्थीत पुसून घ्या, म्हणजे ते चिकटवण्यासाठी सोपे जाईल. तुम्ही दोन डॅशकॅमही घेऊ शकता, म्हणजे एक पुढे आणि मागे अशा दोन्ही ठिकाणी लक्ष ठेवू शकता. 7 / 8पॉवर केबल कारच्या आतील बाजूने, हेडलाइनरच्या खाली आणि पिलर कव्हर्सच्या मागे लपविता येते. जेणेकरून ती बाहेर दिसत नाही. पॉवर केबलचे एक टोक डॅश कॅममध्ये आणि दुसरे टोक कारच्या पॉवर आउटलेट किंवा फ्यूज बॉक्समध्ये प्लग करता येते. फक्त कारची कुठलीही वायर कापली जाणार नाही याकडे लक्ष द्या. 8 / 8कॅमेरा अँगलसाठी कंपनीने सांगितलेल्या सर्व सेटिंग करा. तुमची कार सुरू करा आणि डॅश कॅम आपोआप रेकॉर्डिंग सुरू करतो का हे चेक करा... टॅफिक पोलिसांचे चुकीचे चलन, अपघात, मुद्दामहून अपघात करून पैसे उकळणे आदी गोष्टींपासून तुम्ही वाचू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications