शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे 'ही' 7 सीटर कार; किंमत केवळ 4.25 लाख; मिळतोय बंपर डिस्काऊंट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 3:23 PM

1 / 11
कुटुंब मोठं असेल तर मल्टी पर्पज व्हेइकलची (MPV) मागणी सर्वाधिक असते. कमी किंमतीत मोठी केबिन स्पेस, चांगली सीटिंग कॅपॅसिटी, यासोबतच अॅडव्हान्स्ड फीचर्सचा समावेश मिळणं थोडं कठीण आहे. परंतु अशक्य बिलकुल नाही.
2 / 11
जर तुम्ही 7 सीटर कार खरेदी करण्याची योजना आखत असाल तर Datsun ची ही कार तुमच्यासाठी अतिशय चांगला आणि स्वस्त ऑप्शन ठरू शकते.
3 / 11
जपानची वाहन उत्पादक कंपनी Datsun आपल्या परवडणाऱ्या 7 सीटर कार Datsun GO+ वर ऑगस्ट महिन्यात बंपर डिस्काऊंट ऑफर करत आहे.
4 / 11
Maruti Suzuki इको नंतर ही देशातील दुसरी सर्वात स्वस्त 7 सीटर कार आहे. या महिन्यात ग्राहकांना या कारवर ४० हजार रूपयांपर्यंतची सूट देण्यात येणार आहे.
5 / 11
Datsun च्या या कारवर ग्राहकांना 20 हजार रूपयांचं कॅश डिस्काऊंट 20 हजार रूपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनसही देण्यात येत आहे.
6 / 11
Datsun GO+ ही कार एकूण पाच व्हेरिअंट्समध्ये येते. कंपनीनं या कारमध्ये 1.2 लीटर क्षमतेच्या 3 सिलिंडरयुक्त पेट्रोल इंजिनचा वापर केला आहे. हे इंजिन मॅन्युअल आणि ऑटो ट्रान्समिशन अशा दोन्ही गिअरबॉक्ससह येतं.
7 / 11
या कारचं मॅन्युअल व्हेरिअंट 63PS ची पॉवर आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरिअंट 77PS ची पॉवर आणि 104Nm चा टॉर्क जनरेट करतं.
8 / 11
यात की-लेस एन्ट्री, 7 इंचाची इन्फोटन्मेंट सिस्टम देण्यात आली आहे. याला अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कार प्लेच्या सहाय्यानं कनेक्ट केलं जाऊ शकतं. यामध्ये 14 इंचाचे अलॉय व्हिल्सही देण्यात आले आहेत. तसंच मॅन्युअल एसीबी देण्यात आला आहे.
9 / 11
सुरक्षेच्या दृष्टीनंही यात काही महत्त्वाच्या बाबी देण्यात आल्या आहेत. यामध्ये रिअर पार्किंग सेन्सर, स्पीड अलर्ट सिस्टम, अँटी ब्रेकिंग लॉक सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्युशन (EBD) आणि ड्युअल फ्रन्ट एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत.
10 / 11
या कारची किंमत 4.25 लाखांपासून सुरू होऊन 6.99 लाखांपर्यंत जाते. यामध्ये ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशन असे दोन व्हेरिअंट्स उपलब्ध आहेत. याच्या T CVT ऑटोमॅटिक व्हेरिअंटची किंमत 6.79 लाख रूपयांपासून सुरू होती.
11 / 11
Datsun GO+ ही कार सामान्यत: 18 ते 19 किलोमीटर प्रति लीटर पर्यंतचं मायलेज देते. हे मायलेज रस्त्यांची स्थिती आणि चालवण्याची पद्धत या दोन्हीवर अवलंबून आहे.
टॅग्स :DatsunडॅटसनcarकारMarutiमारुतीMaruti Suzukiमारुती सुझुकीIndiaभारत