Did you see new java? No ...! Let's go out
नवीन जावा बघितली का? नाही ना...! चला सैर करूया... By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 9:56 PM1 / 10भारतीय मनांवर अधिराज्य गाजवलेल्या भन्नाट मोटारसायकल जावाने पुन्हा भारतात पाऊल ठेवले आहे.2 / 10रॉयल एनफिल्डच्या बुलेटला टक्कर देण्यासाठी जावाने एक नाही तर तीन खतरनाक लूक असलेल्या मोटारसायकल त्याही कमी किंमतीत आज लाँच केल्या आहेत.3 / 10सर्वात कमी जावा मोटारसायकलची किंमत 1.64 लाख, जावा 42 ची किंमत 1.55 लाख आणि फॅक्टरीमध्येच क्सटमाईज करता येणारी बॉबर मोटारसायकलला रावा पेराक असे नाव देत या मॉडेलची किंमत 1.89 लाख रुपये एक्स शोरुम एवढी ठेवण्यात आली आहे.4 / 10पेराक ही मोटारसायकल तर हार्ले डेव्हिडसनचा लूक देते. ही बाईक काही दिवसांनी उपलब्ध होणार आहे.5 / 10जावाच्या या पहिल्या दोन मोटारसायकलना 293 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे.6 / 106 स्पीड गिअरबॉक्स आहे. 7 / 10जावाला सिंगल चॅनल एबीएस असून वजन 170 किलो आहे. इंधन टाकी 14 लीटरची आहे.8 / 10जावा कंपनीने 105 शहरांमध्ये डीलरशिप सुरु केली असून बाईकची डिलिव्हरी पुढील वर्षीच्या जानेवारीपासून देण्यात येणार आहे. 9 / 10जावा पेराकला जावा आणि 42 चेच इंजिन देण्यात आले असले तरीही मोठे बोअर आणि 332 सीसीची क्षमता असल्याने थोडी जादा ताकद निर्माण होते.10 / 10जावाच्या या भन्नाट मोटारसायकल महिंद्राच्या मध्यप्रदेशमधील प्रितमपूर येथील प्रकल्पामध्ये बनणार आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications