do not fill fuel tank completely government issues advisory to car bike owners
कार-बाईकमध्ये इंधनाची टाकी पूर्ण भरू नका, अन्यथा...; सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 11:58 AM1 / 8नवी दिल्ली : ग्राहक व्यवहार मंत्रालयाने नुकतेच वाहनांमध्ये इंधन भरण्याच्या खबरदारीबाबत (Fuel Filling Precautions) नवीन परिपत्रक जारी केले आहे. मंत्रालयाने वाहनचालकांना इंधन टाकी कधीही पूर्ण भरू नये, असे आवाहन केले आहे. 2 / 8यासोबतच वाहने तयार करणाऱ्या कंपन्यांवर इंधन टाकीच्या योग्य क्षमतेपेक्षा कमी दाखवल्याचा आरोपही मंत्रालयाने केला आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, वाहनाच्या मॅन्युअल बुकमध्ये दिलेली मर्यादा इंधन टाकीच्या वास्तविक क्षमतेपेक्षा 15-20 टक्के कमी असल्याचे आढळून आले. 3 / 8यामुळे इंधन टाकी भरणाऱ्या नागरिकांची फसवणूक होते की, वाहन विहित मर्यादेपेक्षा अधिक इंधन कसे वापरत आहे. अशा परिस्थितीत लोक पेट्रोल पंपावर चुकीचा आरोप करू लागतात.4 / 8मंत्रालयाने वाहनांच्या इंधन भरण्याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत, ज्यामध्ये इंधन भरताना काही खबरदारी घेण्यास सांगितले आहे. वाहनांमधील इंधन टाकी पूर्ण भरणे धोकादायक ठरू शकते, असे सांगण्यात आले आहे. 5 / 8टाकी पूर्ण भरल्याने इंधनाची गळती होऊ शकते आणि त्यामुळे आग लागण्याचा धोका वाढतो. पेट्रोलमधून बाहेर पडणाऱ्या वाफेला जागा मिळू शकते, त्यामुळे टाकी पूर्ण भरू नये, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. 6 / 8जेव्हा टाकी भरलेली असते, तेव्हा जास्त दाब निर्माण होतो, ज्यामुळे इंजिनमध्ये जास्त इंधन वापरले जाते आणि याचा परिणाम वाहनाच्या इंजिन कार्यक्षमतेवर होतो. यामुळे इंधन योग्यरित्या जळत नाही आणि अधिक हायड्रोकार्बन देखील उत्सर्जित होते.7 / 8जर टाकी भरली असेल तर वाहन एक साइडला झाल्यास इंधन बाहेर पडू शकते, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. पेट्रोल हा अत्यंत ज्वलनशील पदार्थ आहे आणि टाकीतून इंधन गळती झाल्यास आग लागू शकते. मंत्रालयाने वाहन कंपन्यांना ग्राहकांना इंधन टाकी न भरण्याची सक्तीची सूचना करण्याचे आवाहनही केले आहे.8 / 8 दरम्यान, अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ज्यात वाहनात जास्त इंधन टाकण्यावरून लोक पेट्रोल पंप कर्मचार्यांशी भांडताना आढळून आले आहेत. अशा सर्व प्रकरणात, ग्राहकांनी कंपनीच्या विहित मर्यादेपेक्षा जास्त इंधन टाकी भरल्याच्या तक्रारी केल्या होत्या. आणखी वाचा Subscribe to Notifications