Do you remember the two silencer Motorcycles? will Return soon
दोन सायलेन्सरवाली मोटारसायकल आठवतेय का? परत येतेय... By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 4:48 PM1 / 5लहानपणी तुम्ही या दोन सायलेन्सर असलेल्या धकधक मोटारसायकल वरून सैर केलीच असेल. बऱ्याचदा तापलेल्या सायलन्सरला पायही पोळून घेतले असतील. 1996 पर्यंत झेकोस्लावाकियाच्या मूळ कंपनीकडून लायसन घेऊन कर्नाटकमधील म्हैसूरमध्ये उत्पादन मोठ्या झोकात सुरु होते. मात्र, भारतीय बाजारपेठेवर जागतिकीकरणामुळे लादल्या गेलेल्या कठोर नियमांमुळे ही कंपनी कायमची बंद झाली. आता या बंद पडलेल्या मोटारसायकलचे लायसन मिळवून महिंद्राने पुढील महिन्यात भारतात ही मोटारसायकल पुन्हा लाँच करण्याचे ठरविले आहे. 2 / 5वडीलधाऱ्यांच्या काळात डौलाने धावणारी ही मोटारसायकल म्हणजे जावा कंपनीची येझदी. त्यावेळी 250 सीसीच्या इंजिन आणि दोन सायलेन्सर असलेली ही मोटारसायकल खड्ड्यांमधूनही आरामात नेत होती. म्हैसूरमध्ये आजही आंतरराष्ट्रीय जावा डे साजरा केला जातो. या मोटारसायकलचे उत्पादन 1960 मध्ये फारूक ईरानी या म्हैसूरच्या एका व्यक्तीने सुरु केले होते. सुरुवातीला जावा नावाने सुरु झालेले उत्पादन 1974 मध्ये येझदी हे नाव दिले गेले.3 / 5या जावाच्या मोटारसायकलमध्ये दोन सिलिंडर इंजिन तीन लिटरमध्ये 100 किमीचे अंतर कापत होते. 1952 से 1958 या काळात मूळ जावा कंपनीने फोर स्ट्रोक इंजिनवाली मोटारसायकल बाजारात उतरवल होती. मात्र, किंमत जास्त असल्याने तिला मागणी नव्हती. मात्र, भारतात म्हैसूरमध्ये बनलेल्या येझदी बाईकला एवढी मागणी वाढली की ती परदेशातही विकली जाऊ लागली. 4 / 5भारतात जरीही या मोटारसायकलचे उत्पादन बंद झालेले असले तरीही युरोपध्ये आजही जावा 350 सीसी क्लासिक आणि स्पोर्ट अशी दोन मॉडेल्स मिळतात. 5 / 5पुढील महिन्यात 15 नोव्हेंबरला महिंद्रा ही धकधक जावा मोटारसायकल नव्या ढंगात पेश करणार आहे. यासाठी महिंद्राचे नाव लागणार नसून जावा ब्रँडवरच ही मोटारसायकल आणली जाणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications