do you want to buy cng car here are 5 best cheapest option in india check the price list
CNG कार घ्यायचा विचार करयात! ‘हे’ आहेत स्वस्तात मस्त ५ पर्याय; मायलेज ३१ किमी अन् किंमत? By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 12:59 PM1 / 12पेट्रोल आणि डिझेलच्या शतकी उच्चांकामुळे भारतीय ग्राहक आता वेगवेगळ्या पर्यायांचा शोध घेऊ लागले आहेत. इलेक्ट्रिक कारची डिमांड वाढत असली, तरी CNG कारकडेही ग्राहकांचा कल असलेला दिसत आहे. 2 / 12CNG कारच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर TATA पासून ते मारुतीपर्यंत अनेक कंपन्यांनी आपल्या दमदार कारचे CNG व्हर्जन बाजारात लॉंच केले आहेत. यापुढेही काही कार CNG इंधन पर्यायात उपलब्ध करून दिल्या जातील, असे सांगितले जात आहे. 3 / 12देशात सध्या मार्केटमध्ये सीएनजी कारची मोठी मागणी आहे. सीएनजी गाड्या (CNG Cars) मार्केटमध्ये वेगाने येत आहेत. तुम्हीही CNG कार घेण्याचा विचार करत असाल, तर देशातील स्वस्तात मस्त पर्याय आहेत. या कार ३१ किमीपर्यंत मायलेज देतात, असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे. 4 / 12Maruti Alto 800 CNG ही मारुती सुझुकीची सर्वात स्वस्त हॅचबॅक कार अल्टोमध्ये कंपनीने ८००cc क्षमतेचं पेट्रोल इंजिन दिलं आहे. हे इंजिन ४०hp पॉवर आणि ६०Nm टॉर्क जनरेट करतं. इंजिनसोबत ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्स आहे. यातील इंधन क्षमता ६० लिटर असून ही कार २ व्हेरिअंट्समध्ये येते. 5 / 12Maruti Alto 800 CNG ही देशातील सर्वात स्वस्त सीएनजी कार आहे. याच्या LXI मॉडलची किंमत ४.८९ लाख रुपये (एक्स शोरूम) पासून सुरू होते. या कारमध्ये ०.८ लीटरचे सिलिंडर पेट्रोल इंजिन दिले आहे. सीएनजी सोबत 41PS आणि 60Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. हे सीएनजी मध्ये ३१.५९ किमी-किग्रॅपर्यंत मायलेज ऑफर करते.6 / 12Maruti S-Presso CNG दुसऱ्या नंबरवर मारुती एस प्रेसो येते. मारुती सुझुकीची मिनी एसयूव्ही म्हणून ओळखली जाणारी ही कार कंपनी फिटेड सीएनजी किटमध्येही येते. याच्या LXI मॉडलची किंमत ५.२४ लाख रुपये (एक्स शोरूम) पासून सुरू होते.7 / 12Maruti S-Presso CNG या कारमध्ये १.० लीटरचे पेट्रोल इंजिन दिले आहे. इंजिनसोबत ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्स आहे. या कारमध्ये ५५ लिटर क्षमतेची इंधन टाकी आहे. हे सीएनजीमध्ये ३१.२ किमी-प्रति किलोग्रॅमपर्यंत मायलेज ऑफर करते.8 / 12Maruti Eeco CNG या लिस्ट मध्ये तिसऱ्या नंबर वर आहे मारुतीची Maruti Eeco CNG कार. ही एक ७ सीटर कार आहे. मारुती ईकोचे सीएनजी व्हेरियंटची किंमत ५.८८ लाख रुपये (एक्स शोरूम) आहे. मारुती ईको सीएनजी १.२ लीटर पेट्रोल इंजिन सोबत येते. मारुती ईको सीएनजीची ARAI सर्टिफाइड फ्यूल इकॉनमी २०.८८ किमी-किलोग्रॅम आहे.9 / 12Tata Tiago CNG ही कार अलीकडेच लॉंच करण्यात आली आहे. याची किंमत ६.०९ लाख रुपये पासून (एक्स शोरूम) होते. टाटा टियागो सीएनजी १.२ लीटर रेवोट्रॉन इंजिन सोबत येते. इंजिन ७३ पीएसचे पॉवर आउटपूट देते. हे १६५ मिमी ग्राउंड क्लियरेंन्स सोबत येते. कंपनीने सध्या याच्या मायलेजची माहिती दिली नाही. 10 / 12Tata Tiago CNG चार व्हेरियंट XE, XM, XT आणि XZ+ मध्ये आणले गेले आहे. सध्या ही सर्वात स्वस्त फॅक्ट्री फिटेड सीएनजी कार आहे. फीचर्स मध्ये यात पॉवर विंडो, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, हर्मन इंफोटेनमेंट सिस्टम, रियर पार्किंग सेंसर, इलेक्ट्रिकली एडजस्टिबल ओआरवीएम दिले आहे. सीएनजी मॉडल मध्ये खास करून 'iCNG' बॅज दिला आहे.11 / 12Hyundai Santro CNG याची किंमत टियागो प्रमाणे ६.०९ लाख रुपयांपासून (एक्स शोरूम) सुरू होते. या कारमध्ये १.१ लीटर, ४ सिलिंडरचे पेट्रोल इंजिन दिले आहे. 12 / 12Hyundai Santro कार सीएनजी मध्ये ३०.४८ किमी-किग्रॅ पर्यंत मायलेज ऑफर करते. ह्युंदाई सँट्रो सीएनजीमध्ये १.१ लीटर फोर सिलिंडर पेट्रोल इंजिन दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications