शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Driving Licence New Rules 2021 : मोठा दिलासा! आता RTO कडे जायची गरज नाही, या संस्थादेखील देणार ड्रायव्हिंग लायसन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 9:56 AM

1 / 7
ड्रायव्हिंग लायसन बनविण्यासाठी आता पर्यंत तुम्हाला तुम्ही राहत असलेल्या आरटीओ कार्यालयात जावे लागत होते. यासाठी एजंट लागत होते. स्वत: गेला तरी देखील दोन-चार फेऱ्या माराव्या लागत होत्या. तसेच आरटीओच्या ट्रॅकवर चाचणी द्यावी लागत होती. परंतू केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाने (MoRTH) महिन्याभरापूर्वी एक नोटीस काढली आहे. (NGOs, Firms Can Now Open Driver Training Centres, Issue Driving Licence: MoRTH orders)
2 / 7
यानुसार यापुढे आरटीओकडे नवीन लायसन काढण्यासाठी जाण्याची गरज नाही. तर अन्य काही संस्थादेखील तुम्हाला ड्रायव्हिंग लायन काढून देऊ शकणार आहेत. आरटीओ मध्ये देखील लायसन मिळेल परंतू तेथील व्याप कमी करण्यात येणार आहे. वाहनांच्या आरसीसाठी तुम्हाला मात्र आरटीओमध्ये जावे लागणार आहे.
3 / 7
मंत्रालयाच्या नवीन नियमानुसार वैध संस्था, कंपन्या, एनजीओ, ऑटोमोबाईल असोसिएशन, वाहन निर्माता संघ, वाहन निर्माता चालक प्रशिक्षण केंद्र (डीटीसी) यांना मान्यता देणात येणार आहे. या संस्थांद्वारे यापुढे लायसन दिली जातील. यासाठी अशा संस्थांना अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे.
4 / 7
परिवाहन मंत्रालयाच्या निर्देशांनुसार अर्ज करणाऱ्या संस्थांकडे केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 नुसार आवश्यक जमीन आणि आवश्यक सुविधा असणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्या स्थापने नंबर स्वच्छ रेकॉर्ड असायला हवे. या जमीनीवर ट्रॅक बांधावा लागणार आहे.
5 / 7
ड्रायव्हिंग लायसन आणि त्याच्याशी संबंधीत सेवांसाठी केंद्र सरकार वेळोवेळी आवश्यक सूचना जारी करत असते. लोकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत यासाठी केंद्राने २०१९ मध्ये नवीन कायदे केले आहेत. यामध्ये जबर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. दंडही दहा ते १०० पटींनी वाढविण्यात आला आहे.
6 / 7
महाराष्ट्रात अद्याप हे नियम लागू करण्यात आलेले नाहीत. परंतू हे नवीन नियम उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली आदी राज्यांत लागू करण्यात आले आहेत. हे दंड एवढे आहेत की दंडाची रक्कम पाहून वाहनचालकांच्या तोंडाला फेस येऊ लागला आहे.
7 / 7
कोरोना काळानंतर देशातील सर्व आरटीओमध्ये लर्निंग लायसन्ससाठी फी जमा करण्याच्या प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत. नवीन प्रणालीनुसार स्लॉट बुक होतात आणि लर्निंग लायसनसाठी पैसे जमा करावे लागत आहेत. पैसे जमा केल्यानंतर परीक्षेसाठी तारीख देखील तुम्ही तुमच्या सुविधेनुसार निवडू शकता.
टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस