Driving License New Rules Driving license new rules effect from 1st july 2022
Driving License New Rules : सरकारनं Driving License बनवण्यासंदर्भातील नियम बदलले; आता RTO च्या फेऱ्या घालण्याची गरज नाही By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 11:35 AM1 / 12जर आपण ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) बनविण्याचा अथवा रिन्यू करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी खास आपल्यासाठी आहे. कारण आता केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बनविण्याच्या नियमांत बदल केले आहेत. (Driving License New Rules 2022)2 / 12या नव्या नियमांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण या नियमांच्या अंमलबजावणीनंतर आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) फेऱ्या मारण्याची गरज पडणार नाही. केंद्र सरकारने ड्राइव्हिंग लायसेन्ससंदर्भात केलेले हे नियम अत्यंत सोपे आहेत.3 / 121 जुलै 2022 पासून लागू होणार नवे नियम - ड्रायव्हिंग लायसन्स बनविण्यासंदर्भा बदलण्यात आलेल्या नियमांप्रमाणे, आता आपल्याला कसल्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट RTO मध्ये जाऊन द्यावी लागणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून हे नवे नियम 1 जुलै 2022 पासून लागू करण्यात येतील. हे नवे नियम लागू झाल्यानंतर, ड्रायव्हिंग लायसेन्स बनविण्यासाठी वेटिंग लिस्टची प्रतीक्षा करणाऱ्या कोट्यवधी लोकांना दिलासा मिळेल.4 / 12हे नियम लागू झाल्यानंतर, आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी आरटीओमध्ये टेस्ट देण्याची वाट पाहावी लागणार नाही. आपण कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये (Driving Training School) ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नोंदणी करू शकता.5 / 12तेथून ट्रेनिंग घेतल्यानंतर, आपल्याला तेथेच टेस्ट देखील पास करावी लागेल. यानंतर, टेस्ट पास करणाऱ्यांना ट्रेनिंग स्कूलकडून एक प्रमाणपत्र देण्यात येईल आणि याच प्रमाणपत्राच्या आधारे आपले ड्रायव्हिंग लायसन्स तयार होईल.6 / 12थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही आवश्यक - मंत्रालयाकडून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी (DL) अभ्यासक्रमही तयार करण्यात आला आहे. तो थिअरी आणि प्रॅक्टिकल अशा दोन भागांत विभागण्यात आला आहे. लाईट मोटर व्हेईकलसाठीचा (LMV) कोर्स चार आठवड्यांचा असेल, जो 29 तास चलेगी. 7 / 12...तर प्रॅक्टिकलसाठी आपल्याला हायवे, शहरातील रस्ते, गावांतील रस्ते, रिव्हर्सिंग आणि पार्किंग आदी ठिकाणी प्रॅक्टीसला 21 तासांचा वेळ द्यावा लागेल. तर उर्वरीत आठ तास आपल्याला थिअरी शिकवली जाईल.8 / 12ट्रेनिंग सेंटर्ससाठी गाईडलाइंस - रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने ट्रेनिंग सेंटर्ससाठी काही गाईडलाइंस आणि अटीही निश्चित केल्या आहेत. आपल्यालाही या गाईडलाइंससंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे. 9 / 121. दुचाकी, तीन चाकी आणि हलक्या वाहनांच्या ट्रेनिंग सेंटर्ससाठी किमान एक एकर जमीन असणे आवश्यक आहे. तर जड वाहने, प्रवासी आणि माल वाहतूक करणारी वाहने अथवा ट्रेलर्ससाठी ट्रेनिंग सेंटरकडे दो एकर जमीन असणे आवश्यक आहे.10 / 122) ट्रेनर किमान 12वी पास असणे आवश्यक आहे. याच बरोबर त्याच्याकडे किमान 5 वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असणे आवश्यक आहे. 3) ड्रायव्हिंग सेंटर्सचा अभ्यासक्रम थिअरी आणि प्रॅक्टिकल अशा 2 भागांत विभागण्यात आला आहे. 11 / 124) ट्रेनिंग सेंटरवर बायोमेट्रिक सिस्टिम असणे आवश्यक आहे. 5) मध्यम आणि अवजड वाहनांसाठी अभ्यासक्रमाचा कालावधी 6 आठवड्यात 38 तास एवढा अहे. यात 8 तास थिअरी क्लास तर उरलेले 31 तास प्रॅक्टिकल असेल.12 / 124) ट्रेनिंग सेंटरवर बायोमेट्रिक सिस्टिम असणे आवश्यक आहे. 5) मध्यम आणि अवजड वाहनांसाठी अभ्यासक्रमाचा कालावधी 6 आठवड्यात 38 तास एवढा अहे. यात 8 तास थिअरी क्लास तर उरलेले 31 तास प्रॅक्टिकल असेल. आणखी वाचा Subscribe to Notifications