शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Driving Licence Rule : ... तर वाहन चालकाला होऊ शकतो ५ हजारांचा दंड, ३ महिन्यांचा तुरुंगवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2022 4:58 PM

1 / 10
Driving Licence Rule : ड्रायव्हिंग लायसन्सबाबत (Driving Licence) एक मोठी माहिती समोर आली आहे. जर तुम्ही नियमाचं उल्लंघन केलं तर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. लायसन्सबाबत सरकारनं मोठी बातमी शेअर केली आहे. लोकांना जागरूक करण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी असे अपडेट्स शेअर केले जातात.
2 / 10
यावेळी मंत्रालयानं वाहतूक नियमांची माहिती शेअर केली आहे. मोटार वाहन कायद्याच्या कलमानुसार, जर एखाद्या व्यक्तीने ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालवलं तर त्या व्यक्तीला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. यासोबतच तुम्हाला ३ महिन्यांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो. नवीन कायदा येण्यापूर्वी हा नियम मोडल्यास ५०० रुपये दंड आणि ३ महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद होती.
3 / 10
वाहतुकीचे नियम (Traffic Rules) पाळणं अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही वाहतुकीचे नियम पाळले नाहीत, तर तुमचं आणि इतर लोकांचं मोठं नुकसान होऊ शकतं. तुमच्या निष्काळजीपणामुळे तुमच्यासोबतच इतर कोणाचा तरी जीव धोक्यात येऊ शकतो. अशा परिस्थितीत, तुम्हाला नेहमी जबाबदारीने वाहन चालवण्याचा सल्ला दिला जातो.
4 / 10
जर तुम्ही वाहतूक नियमांचे पालन केलं नाही आणि नवीन वाहतूक नियमांनुसार, तुमचं ३२५०० रुपयांचे चलान कापलं जाऊ शकतं. तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवल्याबद्दल ५ हजार रुपये दंड, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) शिवाय वाहन चालवल्याबद्दल ५ हजार रुपयाची पावती फाडली जाऊ शकते.
5 / 10
इन्शुरन्सशिवाय गाडी चालवल्यास २ हजार रुपये चलन, वायू प्रदूषण मानकांचे उल्लंघन केल्याबद्दल १० हजार रुपयांचा दंड तुम्हाला सहन करावा लागू शकतो. यापूर्वी अशा प्रकारचं चलान कापल्याची घटना घडली आहे.
6 / 10
हे प्रकरण सप्टेंबर २०१९ चे आहे. गुरुग्राममध्ये एका गाडी चालकाचे ३२ हजार ५०० रुपयांचे चलान कापण्यात आलं होतं. गाडी चालकाचं गुरुग्राममधील ब्रिस्टल चौकात ऑटो चालान कापण्यात आले.चालकाकडे आरसी, ड्रायव्हिंग लायसन्स, प्रदूषण प्रमाणपत्र, विमा यापैकी कोणतीही कागदपत्रे नव्हती.
7 / 10
मोटार वाहन कायद्यात केलेल्या सुधारणांनंतर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दंडाची रक्कम आता ५ ते १० पटींनी वाढली आहे. या कारणास्तव, जे पूर्वी केवळ १०० रुपयांचे चलान कापून निभावत होतं, आता त्यांना १ हजार रुपयांचे चलन कापावे लागत असल्यानं त्यांचा घाम फुटला आहे.
8 / 10
हेल्मेटशिवाय गाडी चालवल्यास ५०० ऐवजी १००० रुपये दंड आकारला जाईल. तसेच ड्रायव्हिंग लायसन्स ३ महिन्यांसाठी निलंबित केले जाऊ शकते. जास्त दंड आकारला जात नसल्याने लोक वाहतूक नियम पाळण्यास टाळाटाळ करतात, मात्र आता दंड वाढल्यानं वाहतुकीचे नियम मोडण्याआधी लोकांमध्ये भीती निर्माण होणार आहे.
9 / 10
लायसन्सशिवाय वाहन चालवल्यास आता ५०० ऐवजी ५००० रुपये दंड आकारला जाणार आहे. त्याच वेळी, अल्पवयीन व्यक्तीनं वाहन चालविल्यास त्याला १० हजार रुपये दंड भरावा लागेल. यापूर्वी ही दंडाची रक्कम केवळ ५०० रुपये होती.
10 / 10
आतापर्यंत आपत्कालीन वाहनाला रस्ता न दिल्यास कोणताही दंड आकारला जात नव्हता, मात्र अशा वाहनाला रस्ता न दिल्यास १० हजार रुपये दंड भरावा लागणार होता.